रत्नागिरी जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्था मर्यादीत रत्नागिरीची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने संपन्न
रत्नागिरी जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्था मर्यादीत रत्नागिरीची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने संपन्न
रत्नागिरी:-रत्नागिरी जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्था मर्यादीत रत्नागिरीची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक २०/०३/२०२१ रोजी चेअरमन दीनेश पांडुरंग सिनकर, व्हाईस चेअरमन श्रीम. उज्वला पवार व सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पध्दतीने झूम अॅप/यू टयूब द्वारे संपन्न झाली. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र शासन यांजकडील दि.२५/०२/२०२१ व दि. ८ मार्च २०२१ अन्वये कोव्हीड -१९ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७५ अन्वये राज्यातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. ५० पेक्षा जास्त सभासद असलेल्या सर्व सहकारी संस्थांनी व्हीसी अथवा ओव्हीएम द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करावे अशा सूचना देण्यात आलेल्या होत्या. तसेच सदर सभा ३१ मार्च २०२१ पर्यंत घेणे आवश्यक असल्याने पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने झूम अॅप/यू टयूब द्वारे आयोजित करण्यात आली होती. पतसंस्थेचे चेअरमन दिनेश पांडुरंग सिनकर व व्हाईस चेअरमन श्रीम. उज्वला पवार यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व देवी सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरवात करण्यात आली. सन २०१९ -२० या आर्थिक वर्षामध्ये दिवंगत झालेल्या महनीय व्यक्ती, दिवंगत झालेले पतसंस्थेचे सभासद त्यांचे कुटूंबिय, दिवंगत झालेले पतसंस्थेमधील कर्मचारी व त्यांचे कुटूंबिय तसेच दिवंगत झालेल्या ज्ञात अज्ञात व्यक्ती यांना दोन मिनीटे स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यानंतर पूर्व उच्च प्राथमिक, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, माध्यमिक शालांत परीक्षा, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, कला, क्रिडा, सांस्कृतिक व इतर क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सभासदांच्या पाल्यांचे, सर्व सभासदांचे पतसंस्थेमार्फत अभिनंदन करण्यात आले. ना उदय सामंत, मंत्री-उच्च व तंत्रशिक्षण महाराष्ट्र शासन तथा पालकमंत्री सिंधुदूर्ग जिल्हा यांची पद्म पुरस्कार शिफारस समितीमध्ये निवड झाल्याने पतसंस्थेचे चेअरमन दिनेश पांडुरंग सिनकर यांना सन २०१८-१९ चा महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार मिळाल्याने, समीर इंदुलकर , सभासद व माजी संचालक यांची महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागामार्फत व्यावसायिक, संगीत आणि प्रायोगिक नाटव नाटय परीक्षण समितीमध्ये निवड झाल्याबाबत, परशुराम निवेंडकर , विद्यमान चालक यांना मुंबई मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने राज्यस्तरीय कोरोना योध्दा पुरस्कार तसेच लोकजागृती फाऊंडेशनचा कोरोना योध्दा पुरस्कार मिळाल्याने, संजय नलावडे, सभासद व त्यांची कन्या सिमरन यांना भारतीय महाक्रांती सेनेमार्फत कोरोना योध्दा पुरस्कार मिळालेबाबत, पुरूषोत्तम शिर्सेकर, सभासद यांना सन २०१९ -२० साठी महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार जाहिर झाल्याने, कोव्हीड -१९ महामारीमध्ये प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे सेवा बजावलेले जिल्हा परिषद अंतर्गत सर्व अधिकारी/कर्मचारी, पतसंस्थेचे नवनियुक्त स्वीकृत संचालक विजयकुमार मोहिते राजापूर व चेतन झगडे, गुहागर यांचे पतसंस्थेमार्फत अभिनंदन करण्यात आले. पतसंस्थेचे चेअरमन दिनेश सिनकर यांना सन २०१८-१९ चा महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार मिळाल्याने त्यांचा पतसंस्थेमार्फत श्रीम.उज्वला पवार, व्हाईस चेअरमन यांचे हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. पतसंस्थेचे विद्यमान संचालक परशुराम निवेंडकर यांना मुंबई मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने राज्यस्तरीय कोरोना योध्दा पुरस्कार तसेच लोकजागृती फाऊंडेशनचा कोरोना योध्दा पुरस्कार मिळाल्याने त्यांचा पतसंस्थेमार्फत चेअरमन दिनेश सिनकर यांचे हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. पतसंस्थेच्या ऑनलाईन सभेचे आयोजन करणारे दिनेश सोनाळेकर यांचाही पतसंस्थेमार्फत चेअरमन दिनेश सिनकर यांचे हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रास्ताविकामध्ये चेअरमन दिनेश सिनकर यांनी पतसंस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीमध्ये मोलाचे योगदान दिलेल्या सर्व माजी चेअरमन, माजी व्हाईस चेअरमन व सर्व माजी संचालक मंडळे, सर्व आजी व माजी सभासद यांचे मन : पूर्वक आभार व्यक्त केले. तसेच पतसंस्थेच्या आजवरच्या या वाटचालीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष योगदान दिलेल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त केले. यानंतर पतसंस्थेच्या सन २०१९ -२० मधील प्रगतीचा थोडक्यात आढावा सादर केला. सन २०१६ पासून पतसंस्थेमध्ये संचालक म्हणून कार्यरत असताना सर्वसामान्य सभासदांच्या गरजा वेळीच पूर्ण व्हाव्यात, या हेतूने स्थापन झालेल्या पतसंस्थेने गेल्या आर्थिक वर्षातही आपली यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे. पतसंस्थेने यावर्षीही आपला नावलौकिक व दर्जा कामय ठेवून लेखापरीक्षण वर्ग - अ कायम ठेवला आहे. दिनांक ३१/०३/२०१९ अखेर संस्थेची एकूण सभासद संख्या २१७६ इतकी होती. अहवाल सालात नव्याने ३५ सभासदांची वाढ झाली असून सेवानिवृत्तीमुळे राजिनामा दिलेले व मयत झालेले एकूण ७९ सभासद कमी झाल्याने दिनांक ३१/०३/२०२० अखेर २१३२ इतके सभासद आहेत. अहवाल सालात जामीन तारण कर्ज रक्कम रू. ६०,४४,३६,८४१.०० व आकस्मिक कर्ज रक्कम रू. १,७८,४८,३१८.०० असे एकूण रक्कम रू. ६२,२२,८५,१५ ९.०० इतके कर्ज वितरीत करण्यात आले आहे. सन २०१९ -२० मध्ये झालेला निव्वळ नफा रक्कम रू. २,७८,८५,३८१.१५ इतका आहे. मागील आर्थिक वर्षापेक्षा र.रू. ४,९१,०४५.७५ इतका जादा नफा झालेला आहे. मागील शिल्लक ( दि. ३१/०३ म/ २०१९ अखेर) नफा व सन २०१९ -२० मध्ये झालेल्या निव्वळ नफा अशा एकूण रक्कम रू. २,७८,८९, ८४५.१५ पैकी वैधानिक राखीव निधी, लाभांश समकरण निधी, इमारत निधी, धर्मादाय निधी, अधिलाभांश व संचालक मानधन वगळून पतसंस्थेच्या सर्व सभासदांना त्यांचे भाग भांडवलावर १० % प्रमाणे रक्कम रू .२.०६.२५.०४८.०० इतका लाभांश वितरीत करण्यात आलेला आहे. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी पतसंस्थेच्या सर्व सभासदांना लाभांश वाटप केला जातो. परंतू या वर्षी कोव्हीड १९ महामारीमुळे पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आयोजनासाठी ३१ मार्च २०२१ अखेरपर्यंत वाढीव मुदत दिलेली असल्याने गणेशोत्सवापूर्वी लाभांश वाटप करणे शक्य झाले नाही. त्याबद्दल क्षमस्व. परंतू तरीही पतसंस्थेमार्फत सहकार विभागाकडे पाठपुरावा करून संचालक मंडळाच्या मान्यतेने दिवाळीपूर्वी पतसंस्थेच्या सर्व सभासदांना लाभांश वाटप करण्यात आला आहे. यामध्ये सर्व सभासद बंधू भगिनी यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. सहकार विभागाच्या शासन निर्णयानुसार ब वर्ग सभासद ठेवता येत नसल्याने त्याचा पतसंस्थेच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परीणाम झाला असून त्यामुळे यावर्षी पतसंस्थेच्या सर्व सभासदांना केवळ १० % दराने लाभांश वाटप करता आला आहे. पुढील वर्षी कदाचित यावर्षीपेक्षाही कमी दराने लाभांश वाटप करावा लागेल याची सर्व सभासद बंधू -भगिनी यांनी नोंद घ्यावी असे आवाहन सिनकर यांनी केले.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment