(छाया - तय्यब अली)
कोल्हापूर : (प्रतिनिधी) आरटीओ कार्यालय हे प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. त्याचाच एक महत्वाचा घटक म्हणजे आरटीओ कार्यालयात सतत लुडबुड करणारे पंटर हे होय. आपल्या कार्यालयात पंटराचा वावर म्हणजे चहापेक्षा किटली गरम असाच आहे. त्याचबरोबर वर्षानुवर्ष ठिय्या मांडलेल्या अशा प्रवृत्तीच्या लोकांनकडून वाहन धारकांना आणि नागरिकांना उद्धट बोलणे, अपमानास्पद वागणूक दिली जाणे, त्याचबरोबर अशा प्रवृत्तीच्या लोकांमुळे आपल्या आरटीओ कार्यालयात भ्रष्टाचार फोफावत चालला असून, सदर कार्यालयाची सुद्धा बदनामी होत आहे. तसेच काही कर्मचारी सुद्धा कार्यालयीन वेळेत आपल्या जागी न बसता संपूर्ण कार्यालयात मुक्तपणे तिकडे तिकडे वावरताना दिसत असतात. अशा कर्मचाऱ्यांना सुद्धा देखील त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देऊन योग्य ती कारवाई करुन जिल्ह्यातील तमाम वाहनधारकांना न्याय मिळावा. अशा प्रवृत्तींना व पंटराणा ताबडतोब आणि आतापासूनच योग्य ती कारवाई करून, त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा. आपले कार्यालयाकडून असे न घडल्यास आरटीओ कार्यालया विरुद्धसुद्धा योग्य त्या ठिकाणी न्याय मागण्यात येईल. असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने देण्यात आला.
यावेळी संतोष सावंत, पुंडलिक जाधव, अवधूत पाटील, दीपक रावळ, संतोष चव्हाण, धनंजय पाटील, अरुण मस्कर, तानाजी भोसले, उत्तम रवंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121
Comments
Post a Comment