रत्नागिरी पंचायत सभापतीपदी संजना माने
रत्नागिरी पंचायत सभापतीपदी संजना माने
रत्नागिरी:- रत्नागिरी पंचायत समितीच्या उत्सुकता लागून राहिलेल्या सभापतीपदाची निवड बिनविरोध पार पडली. अपेक्षेप्रमाणे तालुक्यातील वाटद पंचायत समिती गणातून प्रतिनिधीत्व करत असलेल्या सदस्या सौ. संजना माने यांची वर्णी लागली. रत्नागिरी पंचायत समिती सभापतीपदाची ही निवड पकिया जिल्हा परिषदेतील लोकनेते कै. शामराव पेजे सभागृहात मंगळवारी (ता. 16) झाली. सौ. प्राजक्ता पाटील यांच्या राजीनाम्यानंतर या निवडीसाठी सत्ताधारी शिवसेनेकडून अनेक इच्छुकांची नावे पुढे चर्चेला येत होती. हे पद खुल्या पवर्गातील महिलांसाठी राखीव होते. मंगळवारी या निवड प्रक्रियेवेळी उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीत सकाळी सेनेतील सदस्यांमधून सौ. संजना माने यांचा एकमेव उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या डॉ. विकास सुर्यवंशी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्यामुळे सभापतीपदाची निवड दुपारी 2.30 वाजता घोषित करण्यात आली. वाटदच्या सौ. संजना माने यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. या निवडीवेळी सेनेचे ज्येष्ठ सदस्य गजानन पाटील, उपसभापती दत्तात्रय मयेकर, माजी सभापती सौ. पाजक्ता पाटील, सदस्य अभय खेडेकर, सुनील नावले, उत्तम सावंत, उत्तम मोरे, विभांजली पाटील, सौ. मेघना पाष्टे आदी उपस्थिती होती. सभापतीपदासाठी इच्छुकांमध्ये सेनेकडून वाटद गणातील सदस्या सौ. संजना माने, कुवारबाव गणातील जयश्री जोशी, हातखंबा गणातील सौ. साक्षी रावणंग, फणसवळे गणातील सौ. आकांक्षा दळवी, गोळपगणातील सौ. पेरणा पांचाळ यांची नावे चर्चेत होती. लवकरच उपसभापती पदासाठी निवड पकिया होणार असून त्यासाठी सदस्य उत्तम सावंत यांचे नाव चर्चेत आहे.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121


Comments
Post a Comment