संगमेश्वर तालुका तंबाखूमुक्त शाळांचा तालुका म्हणून लवकरच घोषित होणार..




 संगमेश्वर तालुका तंबाखूमुक्त शाळांचा तालुका म्हणून लवकरच घोषित होणार..



तंबाखू मुक्त अभियानाबरोबर  दै. फ्रेश न्यूज 


जिल्हा परिषद शिक्षण विभाग रत्नागिरी, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, आरोग्य विभाग, सलाम मुंबई फाऊंडेशन व सहाय्यक सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संगमेश्वर तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांची तंबाखूमुक्त तालुकास्तरीय कार्यशाळा झूम ॲप द्वारे ऑनलाईन घेण्यात आली. रत्नागिरी जिल्हा तंबाखूमुक्त शाळांचा जिल्हा होण्याकरिता सर्व तालुक्यामध्ये कार्यशाळेचे नियोजन प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ निशा देवी वाघमोडे मॅडम, उपशिक्षणाधिकारी व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रवींद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहे. उपस्थित सर्व मुख्याध्यापकांना सलाम मुंबई फाऊंडेशन व सहाय्यक सेवाभावी संस्थेचे जिल्हा समन्वयक श्री रवी कांबळे यांनी तंबाखूमुक्त शाळेचे 9 निकष कशा रीतीने तयार केले पाहिजे व तोबॅक्को फ्री स्कूल ॲप वर माहिती कशा रीतीने भरले पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन केले. सलाम मुंबई फाऊंडेशन चे जिल्हा समन्वयक जयेश माळी यांनी उपस्थित सर्व मुख्याध्यापकांना तंबाखू मुक्त शाळा का बनवली पाहिजे तंबाखू मुक्त शाळा केल्याने शाळा व समाज कशा रीतीने तंबाखू मुक्त होतो या संदर्भात मार्गदर्शन केले. विषय तज्ञ समीर काबधुले यांनी सर्व मुख्याध्यापकांना तंबाखू मुक्त शाळेचे निकष पूर्ण करण्यासाठी आव्हान केले. सदर कार्यक्रमासाठी संगमेश्वर तालुक्याचे गटशिक्षणअधिकारी श्री प्रदीप पाटील, विस्ताराधिकारी श्री शशिकांत तीरभवणे, श्री प्रकाश जाधव, सर्व केंद्रप्रमुख, सर्व मुख्याध्यापक' वरिष्ठ प्राचार्य, सलाम मुंबई फाऊंडेशन व सहाय्यक सेवाभावी संस्थेचे अधिकारी उपस्थित होते.



........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121

Comments