(छाया - तय्यब अली)
कोल्हापूर : (प्रतिनिधी) सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने उत्पादक ते ग्राहक या योजनेअंतर्गत कोल्हापूर शहरातील ग्राहकांना उत्तम प्रतीची फ्रेश द्राक्ष माफक दरात उपलब्ध व्हावी, म्हणून " शाहू स्मारक हॉल" दसरा चौक कोल्हापूर येथे दिनांक 26 ते 30 मार्च 2021 या कालावधीत कोल्हापूर द्राक्ष महोत्सव 2021 चे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर महोत्सवाचे उदघाटन दिनांक 26/3/2021 रोजी सकाळी 10 वाजता. मा. श्री. दौलत देसाई (जिल्हाधिकारी कोल्हापूर) यांच्या शुभहस्ते व मा. श्री दत्तात्रय कवितके, (जिल्हा पुरवठा अधिकारी कोल्हापूर) मा. श्री अमर शिंदे (जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर) व मा. श्री ज्ञानदेव वाकुरे (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कोल्हापूर) व हिंदकेसरी श्री दीनानाथ सिंह तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीचे सभापती श्री दिनकर पाटील, संचालक श्री. जीवन पाटील व श्री अतुल बनसोडे तसेच महेश चव्हाण (सचिव) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुभाष घुले (उपसरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, कोल्हापूर) यांनी केले.
उदघाटनप्रसंगी मा. श्री. दौलत देसाई (जिल्हाधिकारी कोल्हापूर) यांनी अशा महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालास अपेक्षित दर मिळतो. व ग्राहकांना सुद्धा चांगल्या प्रतीचा फ्रेश शेतमाल उपलब्ध होण्यास मदत होते. यामुळे विविध शेतमालासाठी वेगवेगळ्या राज्यात अशा महोत्सवांचे आयोजन पणन विभागामार्फत करण्यात यावे,अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. ज्ञानदेव वाकुरे यांनी कृषी व पणन विभागाच्या माध्यमातून निश्चितच वेगवेगळ्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल. जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळेल असे सांगितले. तसेच श्री अमर शिंदे (जिल्हा उपनिबंधक) यांनी कोल्हापूर शहरातील गृहनिर्माण संस्थांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला थेट विक्रीच्या दृष्टीने पुढे येण्याची आवश्यकता आहे असे सांगितले. तसेच मा श्री दत्तात्रय कवतिके (जिल्हा पुरवठा अधिकारी कोल्हापूर) यांनी पणन मंडळाचा सदरचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून उत्पादक व ग्राहक यांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने मोलाचा आहे असे नमूद केले. कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली संचालक श्री जीवन पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर द्राक्ष महोत्सवामध्ये कोल्हापूरकरांना अनुष्का, रेडग्लोब, सुपर सोनाक्का, माणिकचमन, कृष्णा सीडलेस, आर. के. सुपर, शरद सीडलेस इ. जातीच्या द्राक्षांची चव चाखायला मिळणार आहे.
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
600+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121
Comments
Post a Comment