तंबाखू मुक्त शाळा अभियान मध्ये संगमेश्वर तालुक्यातील कर्ली नं. 1 एक शाळा प्रथम
तंबाखू मुक्त शाळा अभियान मध्ये संगमेश्वर तालुक्यातील कर्ली नं. 1 एक शाळा प्रथम
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभाग, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, आरोग्य विभाग, सलाम मुंबई फाऊंडेशन व सहाय्यक सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखू मुक्त शाळा अभियान हा उपक्रम सुरू आहे.केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांनी सांगितलेले 9 निकषांची अंमलबजावणी शाळेमध्ये करण्यात आली.शाळा तंबाखू मुक्त करत असताना शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी कोणत्याही तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये यासाठी विद्यार्थी व शिक्षकांना तंबाखूचे दुष्परिणाम व COTPA 2003 च्या कायद्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये यासाठी या तंबाखू मुक्त शाळा अभियान चा उपयोग होत आहे.शाळेतील विद्यार्थ्यांना तंबाखूचे दुष्परिणाम विषयी माहिती मिळाल्यामुळे विद्यार्थी आपल्या घरी जाऊन घरातील पालकांना तंबाखू मुक्त राहण्यासाठी आव्हान करत आहेत. म्हणजेच या तंबाखूमुक्त अभियानामुळे समाजात देखील तंबाखूमुक्त वातावरण निर्माण होत आहे.तंबाखू मुक्त शाळा अभियान हा शाळा पुरताच मर्यादित न रहाता समाजाच्या हितासाठी देखील उपयोग होत आहे. आमच्या विद्यालया मार्फत सर्व आव्हान आहे की आपणही या तंबाखू मुक्त शाळा अभियानामध्ये सामील होऊया आणि आपल्या समाजातील लोकांना तंबाखू मुक्त बनवूया. शाळा तंबाखू मुक्त करण्यासाठी शिक्षण विभाग, सलाम मुंबई फाऊंडेशन, सहाय्यक सेवाभावी संस्था , शिक्षक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती, गटशिक्षणाधिकारी श्री. पी एस पाटील सर, शिक्षण विस्ताराधिकारी श्री. मुरकुटे, केंद्रप्रमुख श्री. सनगले, शिक्षक श्री. तानाजी कांबळे श्री.सचिन मिसाळ, सौ.मनाली शितप यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

Comments
Post a Comment