इंधन दर वाढीचा भाज्यांच्या किंमतीवर परिणाम

इंधन दर वाढीचा भाज्यांच्या किंमतीवर परिणाम


 रत्नागिरी:मागील काही दिवसांत पेट्रोल - डिझेलच्या झालेल्या दरवाढीमुळे भाज्यांच्या दरातही १५ ते २० रुपयांनी वाढ झाली आहे . त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडू लागले आहे . इंधनवाढीचा परिणाम भाजी  मंडईतही पाहायला मिळत आहे . ऐन भाजीपाल्याचा हंगामअसताना भाजीपाल्यांच्या किमती कमी होण्याऐवजी वाढत आहेत . घाऊक बाजारात दहा ते वीस , तर किरकोळ बाजारात पंधरा ते तीस रुपयांनी भाजीचे दर वाढले आहेत . कोरोना काळातील टाळेबंदी , इंधनवाढ तसेच अवकाळी पाऊस या कारणांमुळे भाज्यांचे दर वाढले असल्याचे सांगण्यात येत आहे .



..........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.........................................
सत्यमेव जयते ! 24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.........................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक RNI- MAHMAR/2011/39536
...........................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121


Comments