रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक निवासस्थानाचे कुलूप अखेर फोडले




जिल्हा शल्य चिकित्सक निवासस्थानाचे कुलूप अखेर फोडले 



पंचनामा करत घेतला ताबा; संपूर्ण घटनेचे व्हीडिओ चित्रीकरण 


रत्नागिरी:- जिल्हा शासकीय रुग्णालयाचे शासकीय निवासस्थान मिळण्यावरून सुरू असलेल्या पाच महिन्याच्या नाट्यावर आज पडदा पडला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी शासकीय प्रक्रिया करीत तत्कालीन शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी निवास्थानाला लावलेले कुलूप जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगीने सर्व यंत्रणेच्या उपस्थितीत फोडले. त्याचे व्हिडिओ शूटिंग केले. सर्व वस्तूंचा पंचनामा करून त्या ताब्यात घेतल्यावर गृहप्रवेश केला.जिल्हा शासकीय रुग्णालयाचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे आणि डॉ. संघमित्रा फुले यांच्यात शल्य चिकित्सक पदावरून वाद होता. दोघेही दावा करीत असल्याने संभ्रम निर्माण झाला होता. अखेर डॉ. बोल्डे यांची सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून बदली झाली. 5 ऑक्टोबर 2020ला  त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. डॉ. फुले जिल्हा शल्य चिकित्सकपदी नियुक्ती झाल्याने शासकीय निवासस्थान त्यांना मिळणे अपेक्षित होते. परंतु डॉ. बोल्डे यांनी ते सोडलेच नाही. तीन महिने त्यांनी मुदतवाढ घेतली. दरम्यान, तेथे काही नातेवाईक राहण्यासाठी आल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातून मिळाली. त्यानंतरही निवास्थानाला आपले कुलूप लावून ते निघून गेले. निवास्थान मिळविण्यासाठी डॉ. फुले यांनी जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले. त्याकडे दुर्लक्ष झाले.डॉ. फुले यांनी बोल्डे यांचा आडमुठेपणा मोडित काढला. सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस यंत्रणा, नायब तहसीलदार, खासगी स्वयंसेवी संस्था, काही अधिकारी, कर्मचारी आदीं लवाजमा घेऊन डॉ. फुले निवास्थानी गेल्या. कुलूप हॅक्सॉब्लेडने कापून हातोडीने तोडण्यात आले. आत प्रवेश केला तर आतल्या दरवाजांनाही कुलूप लावले होते. तेही तोडण्यात आले. प्रत्येक वस्तूंचा पंचनामा करण्यात आला.



...........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121

Comments