महालक्ष्मी मंदिराच्या दर्शनासाठी नवीन नियमावली जाहीर

 कोल्हापूर :- पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, कोल्हापुरातील करवीर निवासिनीमहालक्ष्मी अंबाबाई मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी  कडक निर्बंध तसेच नविन नियम लागू करण्यात आले आहेत.

दिनांक 25 फेब्रुवारी 2021 पासून पुढीलप्रमाणे बदल करणेत आली असलेची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष विजय जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

१). मंदिर हे सकाळी 7 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते रात्री 8 या कालावधीमध्ये दर्शनाकरिता खुले ठेवण्यात येणार आहे.  दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये मंदिर पूर्णपणे बंद राहणार आहे.

२). मंदिरामध्ये भाविकांचा कर्वी करण्यात येणारे धार्मिक विधी तसे की अभिषेक पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. 

३).भाविकांसाठी करण्यात आलेली ही पासची सुविधादेखील बंद करण्यात आली आहे.

४). मंदिराच्या पूर्व पश्चिम दरवाजातून दर्शन सुरू राहणार असून, पूर्व दरवाजा कडील मंडपामध्ये तसेच मुखदर्शन करिता येणाऱ्या भाविकांच्या करिता देखील, रांगेमध्ये सामाजिक अंतर राखणे करिता आवश्यक मार्किंग करण्यात आलेले आहे. त्यानुसार भाविकांनी सामाजिक अंतराचे पालन करून दर्शन घेण्याचे आहे.

५). मंदिरामध्ये येताना मास्क सॅनिटायझर तसेच भाविकांचे तापमान तपासणी सुरू असून, त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात येताना मास्क वापरणे बंधनकारक असून, मंदिरामध्ये विना मास्क कोणी आढळल्यास रुपये 200 इतकी दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

६). मंदिराच्या परिसरामध्ये भाविकांनी जास्त काळ थांबणेचे नसून, कोणत्याही प्रकारे छायाचित्र काढणे, व्हिडिओ करणे, सेल्फी काढणेस सक्त मनाई असून  तसे करताना आढळून आल्यास मोबाईल, कॅमेरे जप्त करून, 200 रुपये इतकी दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. 

 वरील नियमांचे काटेकोर पालन करून देवीच्या दर्शनासाठी येताना, नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने यावेळी करण्यात आले. यावेळी समितीचे सर्व सदस्य, सचिव विजय पवार, जुना राजवाडा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रमोद जाधव, पुजारी प्रतिनिधी श्री माधव मुनेश्वर यांनी संयुक्त बैठकित सदर निर्णय घेऊन ही नियमावली पत्रकार परिषदेत सादर केली. 


...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121


Comments