गैरकायदा विनापरवाना गोवंशीय प्राण्यांची वाहतूक करणा-या बोलेरो पिकअप चालकावर कारवाई
रत्नागिरी ते कोल्हापूर या दरम्यान गैरकायदा विनापरवाना गोवंशीय प्राण्यांची वाहतूक करणा-या बोलेरो पिकअप चालकावर कारवाई
रत्नागिरी:- साखरपा मुर्शी चेकपोस्ट येथे गैरकायदा विनापरवाना गोवंशीय प्राण्यांची वाहतूक करणा-या बोलेरो पिकअप वर पोलिसांनी कारवाई केली आहे.मंगळवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास घटनेतील आरोपी कोल्हापूर जिल्ह्यातील रा.शिपे, ता.शाहूवाडी येथील संदीप तुकाराम गुरव (३४) याने आपल्या ताब्यातील पिक अप गाडी गाडी क्रमांक एम.एच.०९/सी.यी.६८०५ मध्ये २ लाख ६ हजार रुपये किंमतीचे पाच गोवंशीय प्राणी त्यामध्ये दोन गाय व दोन वासरे यांना वेदना किंवा यातना होतील अशा प्रकारे आखुड दोरिने गुरांच्या मानेला बांधून गाडीत कोंबून गैरकायदा बिगरपरवाना रत्नागिरी ते कोल्हापूर असा वाहतुक करित असताना मुर्शी चेकपोस्ट साखरपा दूरक्षेत्र येथे मिळुन आला. याबाबत देवरूख पोलिस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर २४/२०२१ मध्ये वन्य प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१),(ग),(ड),(च), महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ११९, मोटार वाहन कायदा कलम ६६/१९२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर घटनेची फिर्याद पोलिस शिपाई किरण बाबसो देसाई यांनी केली आहे. सदर घटनेचा तपास पोलिस हवालदार मारळकर करित आहेत.
...........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

Comments
Post a Comment