एकांत-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास

 


एकांत

एकांत भासतो मज
काळ हा महामारी चा
मुले शिक्षणा बाहेर
आहे जीवाला काळजी
कोरोनाचा हा कहर

एकांत भासतो मज
होती जवळ लेकर
किलबिल घरामधे
गोंधळ दिवसभर

जात होता वेळ पुर्ण
काम नव्हते सरत 
कधी नव्हते एकटी
आई होतीच सोबत

आई गेली देवाघरी
दोन्ही लेकर बाहेर
एकांत भासतो मज
रिकामे वाटते घर

छंद जोपासला आता
मी कविता लेखनाचा
जरी एकटी असले
फायदा हा एकांताचा

सौ अनुराधा रत्नाकर उपासे(©®)
(मंगरूळ  तुळजापूर)
फ्रेश न्यूज साहित्य सहवास 



२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
...............................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
...............................

फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256


टिप्पण्या