गोळप येथील वडपिंपळ अपघात प्रकरणी दुचाकी चालकाला अडीच हजारांचा दंड
अपघात प्रकरणी दुचाकी चालकाला अडीच हजारांचा दंड
रत्नागिरी:- तालुक्यातील गोळप येथील वडपिंपळ स्टॉपजवळ बेदरकारपणे दुचाकी चालवून समोरुन येणार्या दुचाकीला धडक देत अपघात केला.याप्रकरणी दुचाकी चालकावर आरोप सिध्द होउन मंळवारी न्यायालयाने त्याला 2 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावला.अपघाताची ही घटना 30 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 6.45 वा.सुमारास घडली होती.सुरेंद्र मोहन चांदोरकर (36,रा.गोळप कातळवाडी, रत्नागिरी) असे दंड ठोठावण्यात आलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. 30 डिसेंबर रोजी तो आपल्या ताब्यातील पल्सर दुचाकी (एमएच-08- एयु-4564) घेउन पावस ते रत्नागिरी असा येत होता.त्याच सुमारास झहीर अब्बास रियाज हातोडकर (25) हा आपल्या ताब्यातील अॅक्सेस दुचाकी (एमएच-08-एटी-6409) वर रुबीया मतलुब फडणीस (27,दोन्ही रा.पूर्णगड मुस्लिम मोहल्ला, रत्नागिरी) हिला पाठीमागे बसवून रत्नागिरी ते पावस असे येत होते.ही दोन्ही वाहने वडपिंपळ स्टॉपजवळ आली असता चांदोरकरचा आपल्या दुचाकीवरचा ताबा सूटला आणि त्याने हातोडकर यांच्या दुचाकीला समोरुन धडक देत अपघात केला.यात दोन्ही वाहनांचे नुकसान होउन तिघांनाही दुखापत झाली होती.
याप्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात सुरेंद्र चांदोरकरवर 1 जानेवारी 2021 रोजी भादंविक 279,337,तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.पूर्णगड पोलिस ठाण्याचे सुर्वे आणि देउसकर यांनी तपास करुन दोषारोपपत्र दाखल केले होते.याप्रकरणी चांदोरकरवर गुन्हा सिध्द झाल्याने मंगळवारी न्यायालयाने त्याला 2 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावला.
...........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

Comments
Post a Comment