छ.शाहू राजांचे जनक घराणे त्यांच्याच पुतळ्याखाली बसले आंदोलनाला

कोल्हापूर :- ( प्रतिनिधी)कोल्हापूर येथील ऐतिहासिक दसरा चौकातील राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या  पुतळ्याखाली त्यांच्या जनक घराण्याचे वंशज व शाहू ग्रूपचे अध्यक्ष  समरजितसिंह घाटगे  यांनी सर्वसामान्य जनता व बळीराजाच्या विविध  प्रश्नांसाठी रणरणत्या उन्हात उपोषण केले.जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून त्यांना पाठींबा देण्यासाठी  संस्था-संघटनासह नागरिकांची दिवसभर रीघ लागली होती. या आंदोलनामध्ये त्यांच्या पत्नी सौ.नवोदिता घाटगे, बंधू वीरेंद्रराजे घाटगे, यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

      उपोषणास सुरुवात करण्यापूर्वी श्री. घाटगे  यांनी सकाळी साडेआठ वाजता करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. दसरा चौकातील राजर्षि  छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नतमस्तक झाले.   लॉकडाऊन काळातील विज बिल माफ करणे,प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहनात्मक अनुदान ,दोन लाखाच्या वरील  कर्जमाफी, शेती पंपाची बिल माफी व अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतक-यांना वाढीव मदत या राज्यातील तमाम शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हे उपोषणाचे हत्यार उपसले.

    


आमदार प्रकाश आवाडे, इंदौर गादीचे संस्थानिक राजे भूषणसिंहजी होळकर, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक,

आम्ही वीज बिल भरणार नाही  कृती समिती, कोल्हापूर, 

महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, जय शिवराय किसान संघटना यशवंत सेना, 

कुंभार समाज सामाजिक संस्था, 

महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा संघ मंडळ,मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ कागल धनंजय महाडिक युवाशक्ती,

भारतीय शेतकरी कामगार पक्ष

 शेतकरी संघटना कसबा बीड

लोकमान्य समुह मडिलगे

 ब्लॅक पॅंथर पक्ष

शेतकरी संघटना यांच्यासह जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायती सेवा संस्था दूध संस्था संघटना यांनी घाडगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविला. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओच्या माध्यमातून पाठिंबा दिला.


१).  दंडवतातून साकडे

कडगाव ता. गडिंग्लज येथील अजित जामदार यांनी उपोषण स्थळ दसरा चौकातून करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर पर्यंत दंडवत घातला. तेथून त्यांनी वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा देवस्थान पर्यंत दंडवत घातला . अंबामाता व श्री ज्योतिर्लिंग चरणी शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीच्या समरजितसिंह  घाडगे यांच्या आंदोलनाला यश मिळू दे असे साकडे घातले.


२). पणजोबांच्या पुतळ्याखाली पणतूचे उपोषण

राजर्षि  छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म कागलच्या घाटगे घराण्यात झाला त्यामुळे ते समरजितसिंह  घाटगे  यांना पणजोबा लागतात. राज्यातील तमाम सर्वसामान्य जनता व शेतकरी रयतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी प्रश्‍नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी   पणजोबांच्या पुतळ्याखाली पणतू उपोषणाला बसले. राजघराण्यातील एखादी व्यक्ती अशा पद्धतीने उपोषणाला बसण्याची ही पहिलीच घटना असल्याची चर्चा जिल्ह्यात दिवसभर सुरु होती. व श्री घाटगे यांचे कौतुक केले जात होते.


...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121

Comments