उत्तराखंडवर मोठं संकट!१५० कामगार बेपत्ता!!!विडियो पहा फ्रेश न्यूज वर !!!

  



उत्तराखंडवर मोठं संकट!
ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्प वाहून गेला, १५० कामगार बेपत्ता!!

उत्तराखंडमध्ये झालेल्या नैसर्गिक प्रकोपात खूप मोठं नुकसान आणि जीवीतहानी झाल्याची माहिती आता समोर आली आहे. हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये जोशीमठ येथील ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्प वाहून गेला असून या प्रकल्पासाठी काम करत असलेले १०० ते १५० कामगार बेपत्ता झाल्याची भीती उत्तराखंडचे मुख्यसचिव ओम प्रकाश यांनी व्यक्त केली आहे.


उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यात धौली गंगा या नदीत मोठा हिमकडा कोसळून नदीला महापूर आला आहे. या पुरात नदी जवळच्या गावांना मोठा फटका बसला असून अनेक घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्पाजवळचा बांध फुटल्यानं नदी लगतच्या गावांमध्येही पाणी शिरलं आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत घटनास्थळी निघाले असून आयटीबीपी आणि एनडीआरएफच्या टीमही रवाना करण्यात आल्या आहेत.


...............................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 

24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................

फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256











Comments