सांजवेळ-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास

 


सांजवेळ

वादळ उठे या मनी,
अन् कोणी साद घाली;
कधीकाळी सांजवेळी,
कधीकाळी सांजवेळी....

चाहुल ही कुणाची भासे,
वारा का हा मन छेडी;
शोध घेती डोळे मग हे,
पण वाटेवरी ना कोणी....
कधीकाळी सांजवेळी,
कधीकाळी सांजवेळी....  

अजुनी त्या वाटेवरी,
मन माझे का या क्षणी;
वाळवंटी या मृगजळ दिसे,
स्वप्न नवे पाहताना मी....
कधीकाळी सांजवेळी,
    कधीकाळी सांजवेळी....  

   वि. प्र. पिलणकर.
 रत्नागिरी.
 फ्रेश न्यूज साहित्य सहवास 
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-


 

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256



Comments