जेसीआयच्या सामाजिक उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करणार - नगराध्यक्ष मा. वैभव खेडेकर ...
जेसीआयच्या सामाजिक उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करणार - नगराध्यक्ष मा. वैभव खेडेकर ...
खेड : जेसीआय खेड ही सामाजिक बांधिलकी जपणारी संघटना आहे. शहरातील कॅफे कॉर्नर येथे होत असलेल्या अपघातांची दाखल घेऊन जेसीआय खेड ने याठिकाणी काँन्वेक्स मिरर बसवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. शहरातील विविध भागात असे मिरर बसविण्यासाठी खेड नगरपरिषद सहकार्य करेल असे सांगून जेसीआय खेड च्या सामाजिक कार्यक्रमाला नेहमी हजर राहणार असल्याची ग्वाही नगराध्यक्ष श्री. वैभव खेडेकर यांनी दिली.
क्लिक करा आणि वाचा: 229 मुलांना कोरोनाची लागण
जेसीआय खेडच्यावतीने रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत कॅफेकॉर्नर येथे बसविण्यात आलेल्या कॉन्व्हेक्स मिरर च्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.यावेळी वाहतूक पोलीस शाखा खेड चे पोलीस कॉन्स्टेबल श्री. घाणेकर यांचा नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .
क्लिक करा आणि वाचा: एक मार्चपासून शाळा बंद कि चालू?शिक्षण मंत्र्यांची घोषणा
याप्रसंगी खेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. कदम, जेसीआय खेड चे अध्यक्ष जेसी. पराग पाटणे, सचिव जेसी. उमेश खेडेकर, खेड जेसीआय चे माजी अध्यक्ष डॉ. श्याम गिल्डा, जेसी. आनंद कोळेकर, जेसी. हनिफभाई घनसार, जेसी. निलेश काणेकर, जेसी. जलाल राजपुरकर, जेसी. गणेश राऊत, जेसी. प्रमोद कांबळे, जेसी. संकेत आपिष्टे, जेसी. आशीष रेपाळ, जेसी. विनय शिरगावकर, जेसी. प्रथमेश खामकर, जेसी. अभिषेक पाटणे, आदी जेसी सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन कार्यक्रम प्रमुख जेसी. सचिन वानखेडे यांनी केले...
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121



Comments
Post a Comment