कोकण रेल्वे मार्गावर धावणार 'विकेंड स्पेशल' रेल्वे
कोकण रेल्वे मार्गावर धावणार 'विकेंड स्पेशल' रेल्वे
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर दोन विकेंड स्पेशल २६ फेब्रुवारीपासून धावणार आहेत. यातील एक गाडी लोकमान्य टर्मिनस ते मडगाव तर दुसरी मडगाव-पनवेल दरम्यान चालवण्यात येणार आहे. लो. टिळक टर्मिनस-मडगांव विकेंड स्पेशल गाडी (०११०१) दि. २६ फेब्रुवारी ते २६ मार्च या कालावधीत दर शुक्रवारी ८.५० वाजता सुटून दुसर्या दिवशी सकाळी ९.५५ वाजता गोव्यात मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात मडगावहून ही गाडी (०११०२) दि. २८ फेब्रुवारी ते २८ मार्च या कालावधीत सायंकाळी ४ वा. सुटून दुसर्या दिवशी पहाटे ३.४५ वा. मुंबईत लो. टिळक टर्मिनसला पोहचेल. बावीस डब्यांची ही गाडी करमाळी, थिवी, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी, राजापूर रोड, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगांव तसेच रोहा, पनवेल तसेच ठाणे स्थानकावर थांबणार आहे.दुसरी विकेंड स्पेशल गाडी मडगांव-पनवेल मार्गावर धावणार आहे. ही गाडी (०११०६) दि. २७ फेब्रुवारी ते २७ मार्च या कालावधीत दर शनिवारी दुपारी १२ वा. सुटून त्याच दिवशी रात्री साडेदहा वाजता पनवेलला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी (०११०५) दि. २७ फेब्रुवारी ते २७ मार्च या कालावधीत पनवेलहून दर शनिवारी रात्री ११.५५ वा. सुटून मडगावला दुसर्या दिवशी ११ वाजता पोहोचेल. बावीस डब्यांच्या या गाडीलाही पहिल्या गाडीसारखेच थांबे आहेत.
...........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

Comments
Post a Comment