संजय राठोड हेच पूजा चव्हाणचे मारेकरी, त्यांच्या मुसक्या आवळल्याच पाहिजे : चित्रा वाघ
मुंबई : संजय राठोडच पूजा चव्हाणचे मारेकरी असून त्यांच्या मुसक्या आवळल्याच पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिली आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव आल्यानंतर सुमारे 14 दिवस नॉट रिचेबल असलेले संजय राठोड आज समोर आले. पूजा चव्हाण प्रकरणात अतिशय घाणेरडं राजकारण करण्यात आलं. परंतु सोशल मीडियातून आणि इतर मार्गाने माझी आणि बंजारा समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. चौकशीतून सत्य समोर येईल, अशी प्रतिक्रिया यावेळी संजय राठोड यांनी दिली.
यावर बोलताना भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या की, "या सगळ्या बलात्काऱ्यांना पाठिशी घालण्यासाठी मंत्र्यांची चढाओढ सुरु आहे. तू जास्त बोलतो की मी जास्त बोलतो. हे चित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रासाठी अजिबातच साजेसं नाही. त्यामुळे सरकारने महिला सुरक्षेचे, महिला सक्षमीकरणाचे नारे बाजूला ठेवून अॅक्शन मोडमध्ये येण्याची गरज आहे. पूजा चव्हाणचा मारेकरी संजय राठोड यांच्या मुसक्या ताबडतोब आवळल्या पाहिजे, ही आमची मागणी आहे."
"अतिशय दुर्दैवी आणि शरमेची गोष्ट आहे की महाविकास आघाडी सरकारमधल्या तीनही पक्षांचे मंत्री, आमदार बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी पुढे आले, त्यांची एकी महाराष्ट्राने पाहिली. ही एकी भंडाऱ्यात 11 निष्पाप जीवांचा होरपळून मृत्यू झाला, ४० दिवस एफआयआर दाखल झाला नाही, तेव्हा दिसली नाही," असंही त्या पुढे म्हणाल्या.
संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया
संजय राठोड यांनी आज पूजा चव्हाण प्रकरणात पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "पूजा चव्हाण हिच्या कुटुंबाच्या दु:खात मी आणि माझा बंजारा समाज सहभागी आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात अतिशय घाणेरडं राजकारण केलं जात आहे, ते अतिशय चुकीचं आणि निराधार आहे. गेल्या 30 वर्षांच्या माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनाला उद्ध्वस्त करण्याचा वाईट प्रकार सुरु आहे. माझ्याबद्दल जे काही दाखवलं त्यात काहीही तथ्य नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीतून सत्य समोर येईल. माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करु नका अशी हात जोडून विनंती त्यांनी केली."
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121



Comments
Post a Comment