देवस्थान समितीचा लोगो असलेले पोष्टाचे तिकिट व कापडी पिशवीचे अनावरण.
कोल्हापूर:देवस्थान समितीचा लोगो असलेले पोष्टाचे तिकिट व कापडी पिशवीचे अनावरण मा. महेश जाधव अध्यक्ष देवस्थान समिती यांच्या हस्ते करण्यात आलेयावेळी पोष्टाची माय स्टँप या संकल्पने अंतर्गत देवस्थान समितीचे अध्यक्ष, सदस्य, सचिव यांचे स्टँप यावेळी देण्यात आलेदहा हजार कापडी पिशव्या ज्यावर देवस्थान समितीचा लोगो व पोष्टाची बेटी बचाव बेटी पढाओ असे प्रिंट करण्यात आले असून या पिशवीतून भाविकांना प्रसाद वितरित केला जाणार आहेयावेळी बोलताना महेश जाधव म्हणाले पोष्टाचे माध्यमातून आई महालक्ष्मी अंबाबाई भाविकांच्या घराघरात पोहचेल तसेच तिकिटाचे माध्यमातून देश विदेशात हि जाईल यात तिळमात्र शंका नाही यावेळी पोष्टाचे प्रवर अधीक्षक ईश्वर पाटीलडाकघर कोल्हापूर विभाग, संजय वाळवेकर सहाय्यक अधीक्षक, निलोफर शेख सहाय्यक अधीक्षक, राजेंद्र पाटील सहाय्यक अधीक्षक कोल्हापूर पोष्ट ऑफिस व अमोल शिंदे यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे वेळी रंकाळा तलावात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवले बद्दल देवस्थान समितीचे सिक्युरिटी गार्ड उमेश साळोखे आणि सुर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी देवस्थान समिती सदस्य शिवाजीराव जाधव राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, उपसचिव सौ शितल इंगवले ,इंजिनिअर सुयश पाटील, मिलिंद घेवारी, व्यवस्थापक धनाजी जाधव,राहूल जगताप आणि कर्मचारी उपस्थित होते.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


Comments
Post a Comment