रत्नागिरी नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत मिशनच्या जनजागृतीच्या औचित्याने राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न

रत्नागिरी नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत मिशनच्या जनजागृतीच्या औचित्याने राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न



रत्नागिरी प्रतिनीधी:-शासनाच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत रत्नागिरी नगर परिषदेच्या वतीने स्वच्छतेबाबत जनजागृतीच्या अनुषंगाने नुकत्याच चित्रकला/पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुचित्रपट निर्मिती, जिंगल स्पर्धा आदी स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ रत्नागिरी नगर परिषद सभागृहात बुधवारी २४ फेब्रुवारी रोजी पार पडला.

                          यावेळी रत्नागिरी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष रोशन फाळके, आरोग्य सभापती निमेश नायर, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, सिटी को-ऑरडिनेटर राणी लाड, स्वच्छता निरिक्षक आरिफ शेख, संदेश कांबळे, सावर, आरोग्य विभागातील अधिकारी अविनाश भोईर आदी उपस्थीत होते. यामध्ये चित्रकला/पोस्टर स्पर्धेमध्ये खुल्या गटात प्रथम मिथिला पाटील, द्वितीय कुणाल किर, पहिली ते पाचवीच्या गटात प्रथम श्रीश ढेपले, द्वितीय श्रावणी कुवार, सहावी ते दहावी गटात प्रथम तन्वी कोलगे, द्वितीय अथर्व आकिवाटे, लघुचित्रपट निर्मिती सिमाली गंधेरे, जिंगल स्पर्धेत श्रावणी पारकर, रांगोळी स्पर्धेत प्रथम कुणाल किर, द्वितीय किर्ती सावंतदेसाई,निबंध स्पर्धेत पाचवी ते दहावी आदिती वघाटे व वैष्णवी रहाटे, खुला गट संतोष खानविलकर, ओंकार पवार आदी विजेत्या स्पर्धकांना बक्षिस वितरित करण्यात आले. 


                                  तसेच यावेळी स्वच्छता दूत म्हणून हरेश रामचंद्र जाधव, उमेश सुरेश कांबळे, मंदा जाधव, प्रमोद महादेव कांबळे, अस्मिता अरुण कोत्रे, प्रितम कांबळे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी बेस्ट वर्कर्स म्हणून देखील काही कर्मचा-यांना सन्मानित करण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत रत्नागिरी शहरातील आस्थापना त्यामध्ये शासकीय कार्यालये, हॉस्पिटल्स, हॉटेल्स आदींचे देखील सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्येही बक्षिस जाहिर करुन ती वितरित करण्यात आली. त्याचप्रमाणे शहरातील शाळांचे देखील सर्वेक्षण करण्यात आले. यामध्येही बक्षिसे वितरित करण्यात आली. गृह निर्माण संस्थांमध्येही सर्वेक्षण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व मान्यवरांचे आभार दिनेश सुतार यांनी मानले.



.........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121


Comments