रत्नागिरी जिल्हा परिषदेतील पदाधिका-यांचे राजीनामे घेणार हे निश्चीत, बदल शंभर टक्के होणार

रत्नागिरी जिल्हा परिषदेतील पदाधिका-यांचे राजीनामे घेणार हे निश्चीत, बदल शंभर टक्के होणार


शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांची प्रतिक्रिया

रत्नागिरी प्रतिनिधी:-रत्नागिरी जिल्हा परिषद पदाधिका-यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी होत असल्याचे बोलले होते. त्यामुळे पदाधिका-यांच्या थोड्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र रत्नागिरी जिल्हा परिषदेतील पदाधिका-यांचे राजीनामे निश्चितच घेतले जाणार. नविन सदस्यांना संधी दिली जाणार असल्याची स्पष्ट प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी दिली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेत शिवसेनेची सत्ता आहे. त्या अनुषंगाने अध्यक्ष रोहन बने, उपाध्यक्ष महेश नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली सभापती कार्यरत आहेत. 


या पदाधिका-यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपला आहे. मात्र या पदाधिका-यांचे राजीनामे घेतले जाणार की त्यांना काही महिन्यांसाठी मुदतवाढ मिळणार याबाबत उलट सुलट चर्चा सुरु होती. मात्र यासंदर्भात विलास चाळके यांनी राजीनामे घेणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मात्र हे राजीनामे कधी घेणार याबाबतचे आदेश अद्याप वरिष्ठ पातळीवरुन आलेले नाहित. मात्र पुढील काही दिवसातच राजीनामे घेण्याची प्रक्रिया पुर्ण केली जाईल. अशी प्रतिक्रिया विलास चाळके यांनी दिली आहे.


..........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.........................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.........................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
...........................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121






Comments