सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत भाजप पायउतार महापौर काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचा
दिग्विजय सुर्यवंशी यांची महापौर म्हणून निवड झाली.शेवटी मा.ना.जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची खेळी यशस्वी झाली. भाजपाला बहुमत असुनही भाजपाच्या प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दे धक्का. भाजपाच्या ७ उमेदवारांनी केलं काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस ला मतदान.
भाजपाकडून पै.धिरज सुर्यवंशी तर राष्ट्रवादी काँग्रेस कडुन मा.दिग्विजय सुर्यवंशी हे उमेदवार होते. पै.धिरज सुर्यवंशी यांना ३६ तर मा.दिग्विजय सुर्यवंशी यांना ३९ मते या अतितटीच्या सामन्यात दिग्विजय सुर्यवंशी यांचा विजय झाला.आणि महापौर पदासाठी त्यांची वर्णी लागली.
सांगली महापालिकेत महाविकास आघाडीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. सांगली महापालिकेत सत्तांतर झालं
आहे.
राष्ट्रवादी
काँग्रेसचे
दिग्विजय
सूर्यवंशी
सांगलीच्या
महापौरपदी
विराजमान
झाले
आहेत.
तर
विशाल
पाटील
गटाचे
उमेश
पाटील
यांना
उपमहापौरपद
मिळालं
आहे.
राष्ट्रवादी
काँग्रेसचे
प्रदेशाध्यक्ष
यांच्या
नेतृत्त्वाखाली
महाविकास
आघाडीने
भाजपला
धक्का
दिला.
सांगली महापालिकेत मागील अडीच वर्षे भाजपची सत्ता होती. महापालिकेत भाजपचे 43 नगरसेवक होतं. परंतु महिला राखीव पदाचा कार्यकाळ संपल्याने पुढील अडीच वर्षांसाठी आज निवडणूक पार पडली. राष्ट्रवादीने यासाठी कंबर कसली होती. त्यातच भाजपचे सात नगरसेवक निवडणुकीआधी नॉट रिचेबल झाल्याने चुरस वाढली होती. चार उमेदवारांपैकी दोघांनी माघार घेतल्यामुळे महापौरपदासाठी दिग्विजय सूर्यवंशी आणि भाजपचे धीरज सूर्यवंशी यांच्यात मुख्य लढत झाली.
चंद्रकांत पाटील यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. कालही त्यांनी काहीही भाष्य करणार नाही, असं सांगितलं होतं. शिवाय संजयकाका पाटील देखील बोलण्यास तयार नाहीत.
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121

Comments
Post a Comment