इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेच्यावतीने पेठवडगाव येथे नगरपालिका चौकात 'घोडागाडी आंदोलन' करण्यात आले.


इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेच्यावतीने पेठवडगाव येथे नगरपालिका चौकात 'घोडागाडी आंदोलन' करण्यात आले.


पेठवडगाव-इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेच्यावतीने महाराष्ट्र भर केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पेठवडगाव येथे नगरपालिका चौकात शिवसेनेच्यावतीने 'घोडागाडी आंदोलन' करण्यात आले.

                  हे आंदोलन ग्राहकसेना जिल्हाप्रमुख दिपक यादव यांच्या मार्गर्शनाखाली व शिवसेना वडगांव शहरप्रमुख संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. दरम्यान, ग्राहकसेना जिल्हाध्यक्ष यादव व शहराध्यक्ष पाटील यांनी घोडागाडी मध्ये बसून पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात फेरी काढत निषेध व्यक्त केला. तसेच केंद्र सरकारच्या विरोधात घोषणबाजी करत इंधन दरवाढीचा विरोध दर्शविला.

                    या आंदोलनात बबलू खाटीक, प्रवीण पाटील, सुकुमार देसाई, विशाल पाटील, भूषण सालकर, यासिर मोमीन, विकास कोळी, भालचंद्र कोळी, रोहन सूनगार, अमृत दौडे, शिवराज मुसळे, शकील पटवेगार, विशाल दोरकर, राहुल शिंदे, हेमलता मुसळे, छाया सुतार, प्रमिला चोथे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. आभार सागर साखळकर यांनी मानले.



 दैनिक फ्रेश न्यूज 

.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
...............................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................

फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील पत्रकार आणि जाहिराती साठी कोल्हापूर ऑफिसला संपर्क  साधा :9529501121/9529880144
                                      कोल्हापूर : freshnewskop24@gmail.com
C.S.No.1002, Flat No.4, Second Floor, Sushani Nivas, Bihind Khadi kapad Udyog, Khasbag Kolhapur.

Comments