229 मुलांना कोरोनाची लागण!
वाशीम:वाशीम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील देगाव येथील आदिवासी निवासी शाळेतील चार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व वसतीगृहात राहणारे तब्बल २२९ विद्यार्थी (students)दोन दिवसांत करोनाबाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी तातडीने या निवासी शाळेला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
क्लिक करा आणि वाचा: सावधान!मुंबईतील ८५ टक्के करोनाबाधितांना नाहीत कोणतीही लक्षणे!
देगाव येथील आदिवासी निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना करोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी दोन दिवसांमध्ये चार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि २२९ विद्यार्थी बाधित आढळून आले आहेत. भावना पब्लिक स्कूल येथील वसतीगृहाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. बाधित आढळलेले सर्व विद्यार्थी शाळेच्या वसतिगृहात (hostel) निवासी स्वरुपात राहणार आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्याातील १५१, यवतमाळ जिल्ह्याातील ५५, वाशीम जिल्ह्याातील ११, बुलढाणा जिल्ह्याातील तीन, अकोला जिल्ह्याातील एक, हिंगोली जिल्ह्याातील आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
क्लिक करा आणि वाचा: निवासस्थानाचे कुलूप उघडताच सापडल्या गहाळ झालेल्या महत्वाच्या फाईल्स
२ लाख हून अधिक वाचक
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121



Comments
Post a Comment