गडहिंग्लजमधील विविध योजनेच्या लाभार्थ्यांचे 2 कोटी 42 लाख बँकेत जमा : तहसीलदार - दिनेश बारगे

गडहिंग्लज: (बाळासाहेब सुतार)  (बुधवार) दिनांक 25 फेब्रुवारी 2021 पासून संजय गांधी लाभार्थीचे दोन कोटी 42 लाख 6 हजार 200 रुपये बँकेत जमा केले असून बँकेतुन लाभार्थांनी अनुदान घ्यावे. तसेच अनुदान घेतल्यानंतर पासबुक भरून घ्यावे असे आवाहन गडहिंग्लजचे तहसीलदार मा. दिनेश बारगे यांचेमार्फत करण्यात आले आहे.

 लाभार्थ्यांचे मागील वर्षीचे सप्टेंबर, ते डिसेंबर अखेरचे थकीत अनुदान त्यांचे खातेवर बँकेत जमा केले आहे. त्यामध्ये सप्टेंबर ते डिसेंबर या महिन्याचे  संजय गांधी, सर्वसाधारण परित्यक्त्या, विधवा अविवाहित, अनाथ, यांच्यासाठीचे अनुदान तर  नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यातील अपंग, विकलांग, श्रावणबाळ, अनुसूचित जाती तसेच दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्यांचे या दोन महिन्याचे अनुदान, इंदिरा गांधी वृद्धपकाळ यांचे सप्टेंबर व नोव्हेंबर या दोन महिन्यातील अनुदान असे सर्व योजनेतील मिळून 2 कोटी 42 लाख 6 हजार 200 रुपयेचे अनुदान आपल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत लाभार्थीनिहाय त्यांचे खातेवर जमा करणेत आले असून ते पैसे काढून सदर पासबुक अपडेट करून घ्यावे. तशा सूचना प्रत्येक बँकेला दिल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

हे अनुदान जमा झाल्याने संबंधित लाभार्थी यांना दिलासा मिळाला आहे.


...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121

Comments