भारतीय जनता पार्टी रिक्षा संघटना वेलफेअर फंडास दहा हजारांची देणगी
भारतीय जनता पार्टी रिक्षा संघटना वेलफेअर फंडास दहा हजारांची देणगी
⭕ भाजपा प्रणित नवभारतीय शिववाहतूक संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि भूमिपूत्र श्री विनोद नारायण जाधव यांनी केली सढळ हस्ते मदत
देवरूख शहरात भाजपा प्रणित रिक्षा संघटना ही रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच स्थापित झाली. याचे औचित्य साधून भाजपा देवरूख कार्यालयाला संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब गावचे भूमिपूत्र आणि भाजपा प्रणित शिववाहतुक संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री.विनोदजी नारायणराव जाधव यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी भारतीय जनता पार्टी रिक्षा संघटना देवरुख शहर वेलफेअर फंडास त्यांनी रुपये दहा हजार मदतीचा धनादेश रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्री.प्रमोद शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला.
या प्रसंगी त्यांचा शाल श्रीफळ देऊन तालुकाध्यक्ष श्री प्रमोद अधटराव यांनी सत्कार केला. तर त्यांचे सहकारी आणि संघटनेचे महाराष्ट्र राज्य चिटणीस आतिक खान यांचे प्रमोद शिंदे यांनी सत्कार केला.
श्री.जाधव म्हणाले की, रिक्षा संघटने बरोबरच अखंड रत्नागिरी जिल्ह्यातील वाहतूकदारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आपल्याला जिल्हा कार्यकारणी तयार करायची आहे. या सर्वांच्या सुखदुःखात आम्ही त्याच्या सोबत असू.
या बांधवांसाठी दोन लाखांचा अपघाती विम्याची तरतूद देखील युवा नेते भगवतसिंह चुंडावत आणि भाजपा तालुका उपाध्यक्ष श्री अभिजीत शेट्ये यांचे सौजन्याने केलेली आहे.
या कार्यक्रमावेळी भाजपा संगमेश्वर तालुकाध्यक्ष श्री प्रमोद अधटराव, उपाध्यक्ष श्री अभिजीत शेट्ये,
उपनगराध्यक्ष श्री सुशांत मुळे,
शहराध्यक्ष श्री सुधीर यशवंतराव,
युवा नेते भगवतसिंह चुंडावत,
युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रूपेश कदम,
जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री तुकाराम किर्वे,
युवा मोर्चा संगमेश्वर तालुकाध्यक्ष श्री राजेश गवंडी,
ओ.बी.सी.शहराध्यक्ष श्री यशवंत गोपाळ,
श्री विजय व्हावळ गुरूजी, श्री विनोद म्हस्के
आणि बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Post a Comment