चिपळुणातील पदपथावरील विक्रेते व खोके धारकांना पालिकेने जागा उपलब्ध करून देण्याची मागणी

चिपळूण: चिपळूण नगरपरिषद हाती घेतलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेत गोरगरीब, हातावर पोट असणाऱ्या पदपथावरील विक्रेत्यांना व तात्पुरते खोके धारकांना सळो की पळो करून सोडले आहे. त्यामुळे आधीच कोरोनाच्या संकटामुळे उध्वस्त झालेल्या या लोकांची पुरती दाणादाण उडाली आहे. त्यामुळे नगरपालिकेने चिपळूण शहरातील पदपथावर असणारे छोटे विक्रेते, व्यावसायिक व खोकेधारक यांच्यावर अन्याय न करता त्यांच्यासाठी स्वतंत्र जागांचे पट्टे उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजूभाई जाधव यांनी केली आहे.


Comments