कुंभाड येथे जमिनीच्या वादातून मारहाण, परस्परविरोधी गुन्हा दाखल

 खेड: तालुक्यातील कुंभाड येथे जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणप्रकरणी पोलिस स्थानकात तिघांवर परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश मोहन भोसले, मनीषा मोहन भोसले, नंदकुमार श्रीपत भोसले (सर्व रा. कुंभाड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. नंदकुमार भोसले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जमिनीत घातलेले कंपाऊंड का ढकलून दिले, याची विचारणा केल्याचा राग धरून मंगेश व मनीषा भोसले यांनी काठीने मारहाण करून दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. भोसले यांच्या तक्रारीनुसार घराच्या जागेलगतचे बांधाचे दगड का काढलेस, अशी विचारणा केल्याच्या रागातून ही घडली.


Comments