प्रस्ताव सादर शेखर निकम यांचे प्रयत्न; कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात होणार शासकीय कृषी महाविद्यालय
दापोली: कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय कृषी व संलग्न महाविद्यालय निर्माण करावे, अशी मागणी चिपळूण-संगमेश्वर मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांनी केली होती. या मागणीसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर या मागणीला यश आले आहे. ठाणे जिल्ह्यातील पालघर येथील कृषी महाविद्यालय, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील कृषी महाविद्यालय, रायगड जिल्ह्यातील रोहा येथील अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय व रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील पदव्युत्तर कृषी शिक्षण संस्था अशा चार शासकीय व संलग्न महाविद्यालये स्थापनेसंबंधी प्रस्ताव कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्यामार्फत सादर करण्यात आले आहेत, अशी माहिती बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शिक्षण संचालनालयाचे कुलसचिव प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment