रत्नागिरीत हेल्मेट सक्ती, सिग्नल तोडल्यास दंड, मग अवैध वडाप वाहतूक, अनधिकृत हेल्मेट विक्रिवर बंदी का नाही?

 आर.टी.ओ. कार्यालय व वाहतूक पोलिस शाखा याकडे लक्ष देणार का?


रत्नागिरी प्रतिनिधी:-

रत्नागिरी शहरात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. हेल्मेट न घातल्यास दंड आकारण्यात येतो. सिग्नल तोडल्यास दंड आकारण्यात येतो. मग शहरात अधिकृत हेल्मेट कुठे मिळतात याचे उत्तर पोलिस प्रशासन का देत नाही?

शहरातून वडाप वाहतूक सुरु असल्याबाबत जोरदार चर्चा आहे. वडाप च्या माध्यमातून जनतेची लूट सुरु असल्याचे देखील बोलले जात आहे. रत्नागिरी ते चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, लांजा अशी वडाप वाहतूक सुरु आहे. या वाहतुकीला कुणी परवानगी दिली?, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वडाप गाड्यांमधून शासनाने निर्देशीत केलेले सर्व नियम पाळले जातात का?, याकडे आर.टी.ओ. कार्यालय व वाहतूक पोलिस कार्यालय लक्ष देत आहेत का? असे उलट सुलट सवाल उपस्थीत केले जात आहेत. काही राजकीय प्रतिनिधी बोलतात की लॉकडाऊनमुळे अनेकांचे उद्योग, छोटे छोटे व्यवसाय बंद पडले. ही गोष्ट खरीच आहे. मात्र अनधिकृत व्यवसाय सुरु असल्यास त्याला पायबंद कोण घालणार असाही सवाल नागरीकांमधून उपस्थीत करण्यात येत आहेत. साळवी स्टॉप ते टी.आर.पी. पर्यंत हेल्मेट विक्रिची दुकाने सुरु आहेत. यांना कुणाची परवानगी आहे?, हेल्मेट विक्रिबाबतचे आणि हेल्मेट गुणवत्तेबाबतचे नेमके काय निर्देश आहेत?, त्याचे काटेकोरपणे पालन होते का?, पोलिस प्रशासनाच्या वतीने याबाबत सर्वेक्षण होते का? असाही सवाल उपस्थीत केला जात आहे. 



Comments