पदवीधर निवडणुकीत घटक पक्ष भाजपमागे फरफटत येतील या भ्रमात भाजपने राहू नये - संदेश भंडारे पुणे पदवीधर विधानपरिषद मतदारसंघात आंबेडकरी पदवीधरांची मते सर्वाधिक
सांगली प्रतिनिधी - पुणे पदवीधर निवडणुकीत महायुतीचे घटकपक्ष रासप, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम आणि आरपीआय हे घटक पक्ष भाजप उमेदवारांच्या मागे बिनबुलाए फरफटत येतील या भ्रमात भाजपने राहू नये, आरपीआय सह घटक पक्षाची ताकद दाखवून दिली जाईल असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष संदेशभाऊ भंडारे यांनी भाजप ला दिला.
मिरज येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते, यावेळी जिल्हाअध्यक्ष संजयजी कांबळे, युवक जिल्हाध्यक्ष अशोकराव कांबळे, भटके विमुक्त आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीशजी जाधव, विध्यार्थी आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सचिन सव्वाखण्डे, आय टी आघाडी जिल्हाध्यक्ष योगेंद्रभाऊ भाऊ कांबळे, सरचिटणीस डॉ रवीकुमार गवई, युवा नेते श्वेतपद्म कांबळे, महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा छायादीदी सरवदे आटपाडी तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात आदी प्रमुख उपस्थित होते.
सांगली लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष भंडारे पुढे म्हणाले, पुणे पदवीधर मतदारसंघात एकूण मतदानापैकी सर्वाधिक मते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांची असून, ही आंबेडकरी पदवीधरांची मते विजयामध्ये निर्णायक ठरतील, भाजप च्या उमेदवारांना आरपीआयची मते नको असतील तर कोणाला निवडून आणायचं आणि कोणाला पडायचं यात आरपीआय कार्यकर्ते तरबेज आहेत, विश्वासात घेत नसतील तर उद्याचा निवडणुकीचा निकाल उलटवण्याची ताकद आंबेडकरी जनतेत आहे, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री ना डॉ रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार पुणे पदवीधर मतदारसंघात काम केले जाईल,
जिल्हाअध्यक्ष संजयजी कांबळे म्हणाले, आरपीआय ची ताकद प्रत्येक गाव खेडयात आहे भाजप जर नजरअंदाज करून निवडणूक जिंकायचे स्वप्न बघत असेल तर त्यांना जड जाईल.
युवक अध्यक्ष अशोकराव कांबळे म्हणाले, निवडणुकीच्या वेळी घटक पक्षांची आठवण येत नसेल तर निकाल विरोधात लावण्याची ताकद आमच्यात आहे सगळे उमेदवार सांगली जिल्यातील आहेत कोणाला मदत करायची ते लवकरच ठरवू.
याप्रसंगी विध्यार्थी आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सचिन सव्वाखण्डे, आय टी आघाडी जिल्हाध्यक्ष योगेंद्रभाऊ भाऊ कांबळे, सरचिटणीस डॉ रवीकुमार गवई, युवा नेते श्वेतपद्म कांबळे, महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा छायादीदी सरवदे, आटपाडी तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात यांची भाषणे झाली.
स्वागत व प्रास्ताविक मिरज तालुकाध्यक्ष अरविंद कांबळे यांनी केले, यावेळी महिला मिरज तालूका अध्यक्षा मंगलताई बनसोडे, शहराध्यक्ष अविनाश कांबळे, विक्रम भिसे, प्रशांत मोटे, पोपटराव कांबळे, संतोष सरवदे, अक्षय कांबळे,आकाश कांबळे,दिनेश चव्हाण, हरिष कोलप, पृथ्वीराज रांजणे, राम कांबळे, अक्षय कांबळे, दिलीप माळी, अविनाश साठे, संतोष कांबळे, पिंटू कांबळे यांच्या सह कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते. शेवटी आभार पोपटराव बनसोडे यांनी मानले.

Comments
Post a Comment