२५ रोजीचा कार्तिकी उत्सव शांततेने, संयमाने साजरा करावा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहीती रत्नागिरी प्रतिनिधी:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजुनही आपल्याला सजग रहायचे आहे. अजुनही परराज्यातून, परजिल्ह्यातून येणारे नागरिक यांच्या लक्ष ठेवून त्यांच्या चाचण्या करुन घेणे आवश्यक आहे. कंपन्यांमध्ये बाहेरील राज्यातून येणारे लोक यांच्या देखील तपासण्या करुन घेतल्या पाहिजेत. शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेत असताना जिल्ह्यातील ३८०० शिक्षकांच्या कोव्हिड टेस्ट झाल्या. त्यामध्ये ७ शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह आले. त्यामुळे आगामी २५ रोजी आयोजीत कार्तिकी उत्सव शांततेने, संयमाने साजरा करावा असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
भाजपा कार्यकर्त्यांचे निवेदन
रत्नागिरी नगर परिषद हद्दीत पाणी टाकी उभारण्यासाठी आलीमवाडी येथील सुमारे ४ गुंठे जागा नगरपरिषद खरेदी करत आहे. सदर जागेची किमत शासनाच्या त्रिसदस्यीय समितीने ठरवले असून ती किंमत १.२०,३५.१५१ / - एवढी ठरलेली असल्याचे बोलले जाते. मात्र आलीमवाली परिसरातील जमिनीची एवढी भली मोठी रक्कम अवास्तव , जास्त आहे. त्या भागात एवढी जास्त किंमत जमिनीची नाही. मात्र अतिरिक्त दर देऊन ही जागा खरेदी केली जात आहे. हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे. इतक्या अतिरिक्त दराने जागा खरेदीचा निर्णय करताना केवळ जिल्हा स्तरीत समितीने किमत ठरवली. एवढ्या आधारावर या जमिनीची खरेदी करणे पूर्णतः योग्य ठरेल , नगरपरिषद गेली ५ वर्षे पाणी योजना पूर्ण करू शकली नाही. त्याच योजनेसाठी आता अतिरिक्त खर्च जमीन खरेदीसाठी करण्याचा घातलेला घाट हा जनतेच्या पैशाचा अपव्यय वाटतो. इतका अतिरिक्त दर या शहरातील काहीश्या अविकसित राहिल्येल्या भागात नक्की नाही. शासकीय समितीने तो कसा ठरवला याबाबत आश्चर्यच वाटते. नगरपरिषद ही लोकप्रतिनिधीनी चालवणे आणि ती सारासार विचार करून नगरपरिषदेचे पर्यायाने जनतेचे हित रक्षण्यासाठी निर्णय घेऊन चालवणे अपेक्षित आहे. मात्र अतिरिक्त दर देऊन जागा खरेदी संदर्भात दि .२६ / ११ / २०२० च्या सर्वसाधारण सभेत आलेला विषय पाहता सखेद धक्का बसला. हा निर्णय होण्यास प्रतिरोध करावा , जनतेच्या पैशाची उधळपट्टी होऊ नये अशा तीव्र इच्छेतून निवेदन भाजपाच्या वतीने सादर करण्यात आले. अवास्तव, अतिरिक्त रक्कम देऊन सदर जागा खरेदीबाबत निर्णय होऊ नये पाणी योजनेसाठी अन्य जागेचा पर्याय शोधावा असे मत भाजपाने व्यक्त केले. हे निवेदन सादर करत असताना भाजपा शहराध्यक्ष सचिन करमरकर, शैलेश बेर्डे, कुसुम शर्मा, निशांत राजपाल, पमू पाटील, राजीव कीर, उमेश कुलकर्णी, सौ.जठार आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment