शास्री पुल ते नायरी रस्ता दूरुस्तीच्या नावाखाली प्रतिवर्षी लाखोरूपये पाण्यात !


जो पर्यंत पक्की गटारे होत नाहीत तोपर्यंत रस्ता दूरुस्त करुच नये, कसबा पंच क्रोर्षीतील सुज्ञ लोंकाची मांगणी अाहे. प्रतिवर्षी शास्रीपुल कसबा ते नायरी रस्त्यावर दूरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयाचा चुराडा होतो, मात्र रस्त्याला पक्की गटारे नसल्याने येणार्‍या पावसाळ्यात रस्ता धुपुन जातो व शासनाचा लाखो रुपये निधी फुकट जातो हे नेहमीचेच झाल्याने अाता जो पर्यंत शास्री पुल ते नायरी रस्त्यावर नव्याने खर्च टाकु नये अशी मांगणी पुढे येत अाहे. 

कसबा व फणसवणे मोहल्ला येथे तेथील रहीवाशी गटारे काढुन देत नसल्याने पक्की गटारे बांधता वा साफ करता येत नाहीत,त्यामुळे बनवलेला रस्ता वाहुन जातो ,हे प्रत्येक वर्षाचे रडगाणे असल्याने जो पर्यंत पक्की गटारे होत नाहीत तोवर रस्ता दूरुस्तीचे काम करुच नये अशी मांगणी जनतेतुन होत अाहे . 

Comments