याला जबाबदार कोण...?

 नगरसेवक योगेंद्र थोरात यांचे महापालिकेच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन, प्रभागातील नागरिक समस्या साठी अधिकारी लक्ष देत नाहीत, म्हणून प्रभागातील नदीवेस बौद्ध वसाहत ,अण्णाभाऊ साठे नगर, या भागात प्रभाग पाच मध्ये ड्रेनेजचे काम चालू असल्याने गेली वीस दिवस ड्रेनेजचे पाणी लोकांच्या दारात आले आहे, ऐन दिवाळीत नागरिकांना सगळी घाण सोसावी लागली ,ते दुरुस्त करायला आले ,आणि पिण्याचे पाणी बंद करून गेले, त्यामुळे नागरिकांची फारच पंचाईत झाली, असा हा ड्रेनेज व पाणी विभागाचे बोगस कारभार सुरू आहे ,याविरोधात नगरसेवक योगेंद्र थोरात आणि सहकारी नगरसेविका यांनी महापालिकेमध्ये ठिय्या आंदोलन केले ,अधिकाऱ्यांना जागेवर नेऊन दोन दिवसात काम करण्याचे मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले, 


याला जबाबदार कोण? 
मिरज शास्त्री चौक ते महात्मा फुले चौक ,मृत्यूचा सापळा , बनला आहे
गेली पंचवीस वर्ष या रस्त्याचे काम दुर्लक्षित असून प्रशासनाकडून काहीच लक्ष दिले जात नसून निवडणुकीच्यावेळी फक्त आमदारांच्या कडून आश्वासनाची खैरात, ऐकून घेणे, येथील जनतेच्या, नशीबी आले आहे, 
फोटो आोळ_ मिरज शास्त्री चौक ते महात्मा फुले चौक रस्त्याची  झालेली दुरवस्था,

Comments