संगमेश्वर तालुक्यातील गडनदी प्रकल्पासंदर्भातील कालवा कामे व पुनर्वसनाची कामे लवकरात लवकर पुर्ण करण्यात येतील अधिक्षक अभियंता श्रीमती वैशाली नारकर यांची माहीती
रत्नागिरी प्रतिनिधी:-
संगमेश्वर तालुक्यातील गडनदी प्रकल्प 2007 सालीच पूर्ण झाला. तात्कालिन अधिकारी यांनी फक्त धरणाच्या कामावरच लक्ष दिल्याने पुनर्वसन व कालवा कामे रखडली होती. अधिक्षक अभियंता श्रीमती वैशाली नारकर रत्नागिरी मंडळामध्ये हजर झाल्याने प्रथम पुनर्वसन व कालवे कामांमध्ये लक्ष देऊन सिंचनाला प्राधान्य दिले आहे. एका वर्षातच काळंबेवाडी पुनर्वसन गावठाण सपाटीकरण काम यांत्रिकी विभागामार्फत हाती घेऊन जवळपास पुर्ण होत आले आहे. नागरी सुविधा कामे, विद्युतीकरण यांना प्रापण सुचिमध्ये मान्यता घेतली असून प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केले आहे. मा.सचिव व मुख्य अभियंता यांच्या सुचनेनुसार प्रकल्पाच्या मंजूर किंमतीमध्येच व अंतर्भूत असलेलीच कामे करण्याचे नियोजन असल्याने त्याव्यतीरीक्त अतिरिक्त मागणी असल्यास त्यासंबंधीचे प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहेत. धरणाचे काम हे ACB Enquiry व कोर्ट केस यासाठी ठाणे पाटबंधारेकडे वर्ग करण्यात आले असून शेतकरी प्रकल्पग्रस्त यांच्या हितासाठी व कामे जलदगतीने व गुणवत्तापुर्ण होण्यासाठी पुनर्वसनाची कामे मार्च अखेर पुर्ण करण्यात येणार असल्याची माहीती मंत्री महोदय व आमदार यांना देण्यात आली आहे.

Comments
Post a Comment