वरूडमधील २१ हजार हेक्टरवरील कपाशी बाद

 


सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे पारंपरिक पिके व फळपिकांच्या बाधित क्षेत्राबाबत नुकसानभरपाईसाठी १६ कोटी ३९ लाख २६ हजार २४५ रुपये अनुदानाची मागणी जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे करण्यात आली आहे. सुमारे २३ हजार हेक्टर क्षेत्रातील पिके या पावसामुळे मातीमोल झाले. या २३ हजार हेक्टरपैकी एकट्या वरूड तालुक्यातील २१ हजार हेक्टर शेती आहे, ज्यात कपाशीची लागवड करण्यात आली होती. वरूड तालुक्यातील कपाशी पूर्णपणे बाद झाली.

सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झालेले बाधित क्षेत्र २३ हजार २८४ हेक्टर आहे. बाधित शेतकरी संख्या ४४ हजार ३२० आहे. जिरायत पिकाखालील बाधित क्षेत्र २२ हजार ७८५ व बाधित शेतकरी संख्या ४३ हजार ३१० आहे. फळपीक वगळता बागायती क्षेत्राच्या नुकसानाचे बाधित क्षेत्र ०.५५ व शेतकरी संख्या दोन आहे. फळपिकाखाली बाधित क्षेत्र ४९८.६७ असून, शेतकरी संख्या १ हजार ८ आहे.

बाधित जिरायत शेती क्षेत्रात चांदूर रेल्वे तालुक्यात कपाशीचे १ हजार ६२५ हेक्टर, धामणगाव रेल्वे तालुक्यात कपाशीचे १३४.९४, व तुरीचे ३.२० हे असे एकूण १४०.१४ हेक्टर, वरूड तालुक्यात कपाशीचे २१ हजार हेक्टर, अंजनगाव सुर्जी तालुक्यात कपाशीचे १७.५६ हेक्टर, तुरीचे २.५० हेक्टर, मूगाचे ०.२० हेक्टर असे एकूण २०.२६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. फळपीक वगळता बागायती क्षेत्रातील अंजनगाव सुर्जी येथील ०.५ हेक्टर केळी क्षेत्र व ०.०५ हळद असे एकूण ०.५५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले.

सप्टेंबर महिन्यात संत्री फळपिकाखालील ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या क्षेत्रात भातकुली तालुक्यात ५.२३ हेक्टर, चांदूर रेल्वे तालुक्यात ४८८.२३ हेक्टर, मोर्शी तालुक्यात ३.३ हेक्टर, अंजनगाव सुर्जी तालुक्यात ०.४१ हेक्टर, चिखलदरा तालुक्यात १.५० हेक्टर असे एकूण ४९८.६७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले.

Comments