कोकणातील शेतक-यांसाठी स्वतंत्र पॅकेज जाहिर करावे, प्रविण दरेकर यांची मागणी

 


कोकणात भात शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीची भरपाई म्हणून कोकणासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र पॅकेज जाहिर करावे अशी मागणी राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. प्रविण दरेकर शनिवारी नुकतेच कोकण दौ-यावर आले होते. त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजीत केली होती.

यावेळी प्रविण दरेकर म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यात सामुहिक शेती केली जाते. या सामुहिक शेतीला प्रोत्साहन दिले पाहिजे. तसेच ज्या शेतीच्या नजिक नदी नाले आहेत. त्यामुळे शेतीचे धूप होते. त्या ठिकाणचे सर्वेक्षण होऊन धूपप्रतिबंधक बंधारे उभारण्यात यावेत अशी मागणी प्रविण दरेकर यांनी यावेळी केली. 

या पत्रकार परिषदेत रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार निलेश राणे, विधान परिषद आमदार प्रसाद लाड, भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड.दिपक पटवर्धन, राजापूरचे रविंद्र नागरेकर, नित्यानंद दळवी, रत्नागिरी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजेश सावंत, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, राजीव कीर, नंदकिशोर चव्हाण, संजय निवळकर, भाजपा तालुकाध्यक्ष सुशांत चवंडे आदी उपस्थित होते.

Comments