जयगडमध्ये दोन नौकांना सरंग्याची लॉटरी
जयगड येथील दोन नौकांना सरंग्याची लॉटरी लागली आहे. दोन नौकांना प्रत्येकी अडीच टन असा पाच टन सरंगा सापडला आहे. 400 रुपये किलोने हा सरंगा विकला गेला असून सरंगा विक्रीतून दहा लाखापेक्षा अधिकची उलाढाल झाली आहे. बुधवारी या नौका मासेमारीसाठी बाहेर पडल्या होत्या. गुरुवारी सायंकाळी या नौकांनी जयगड बंदरानजिक डोल सोडली आणि बघता बघता जाळ्यात बंपर सरंगा सापडला.

Comments
Post a Comment