शेतकरी विरोधी काळा कायदा विरोधात शहरा मध्ये सह्यांची मोहीम सुरु
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचने नुसार जिल्हाध्यक्ष अँड विजयराव भोसले यांच्या मार्गर्शनाखाली व शहर निरिक्षक रमेश शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी विरोधी काळा कायदा विरोधात शहरा मध्ये सह्यांची मोहीम सुरु केली. त्यावेळेस उपस्थित प्रमुख कार्यकर्ते यांना जिल्हा उपाध्यक्ष व शहर निरिक्षक रमेश शहा व सोशल मिडिया प्रमुख कपिल नागवेकर यांनी मार्गदर्शन केले व आपापल्या विभागात सह्या घेवून आणण्यासाठी सह्या करावयाचे अर्ज प्रमुख कार्यकर्त्यांकडे सुपूर्त केले.
तदप्रसांगी माजी उपनगराध्यक्ष बाळा मयेकर,जिल्हा अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष हरीश शेकासन,महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी आगाशे, जिल्हा चिटणीस शब्बीर भाटकर,अशपाक काद्री,शहर अध्यक्ष राकेश चव्हाण, दीपक राऊत,सचिन मालवणकर, स्नेहा पीलंकर,माजी सैनिक सुभाष सावंत,क्रांती रॉबर्ट,महिला तालुका चिटणीस सुश्मिता सुर्वे,गंगाराम रसाळ,चंद्रकांत सोलकर इतर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते

Comments
Post a Comment