वादळग्रस्त शाळांना अपुरा निधी उर्वरित निधी तातडीने मंजूर करण्याची मागणी


निसर्ग' चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या मंडणगड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या शाळा दुरुस्तीसाठी अंदाजपत्राकानुसार सुमारे ४ कोटी १३ लाख रुपयांचा निधी आवश्यक आहे. मात्र, राज्य सरकारने नुकतेच क्षतिग्रस्त शाळा दुरुस्तीसाठी १ कोटी ४० लाख रुपयांचा निधी दापोली, मंडणगड, खेड तालुक्यातील शाळांसाठी मंजूर केल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस, पंचायत समिती सदस्य नितीन म्हामुणकर यांनी दिली. सदर मंजूर निधी अपुरा असून मंडणगड तालुक्यातील शाळांना अधिक निधी मिळावा व उर्वरित निधीही तातडीने मंजूर करावा, अशी मागणी म्हामुणकर यांनी केली आहे.

Comments