रत्नागिरी जिल्ह्यात अर्भक मृत्युदरात घट
आरोग्य विभागामार्फत विविध उपक्रम राबवल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अर्भक मृत्यू दरामध्ये लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले. सध्या भारताचा अर्भक मृत्यू दर ३४ इतका असून, राज्याचा १९ इतका आहे. रत्नागिरीत मात्र हे प्रमाण कमी असून, मृत्यूदर फक्त ७ इतका आहे. गतवर्षाची तुलना करता हा मृत्यूदर जिल्ह्यात ०.८४ टक्क्यांनी घटला आहे, अशी माहिती जि. प. आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली.

Comments
Post a Comment