नातू महाविद्यालयात "माझा वाढदिवस माझी जबाबदारी" उपक्रमाचे उदघाटन


चिपळूनमधील मार्गताम्हाने येथील डॉ. तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयामध्ये समाजउपयोगी उपक्रम आयोजित करण्यासाठी  आऊटरिच सेंटर फॉर एक्स्टेंशन ऍक्टिव्हिटीज या नवीन विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. या अंतर्गत प्राध्यापक समाजाला भेडसावणाऱ्या समस्यावरती परिसरातील शाळा व महाविद्यालयात जाऊन विद्यार्थी व पालकांसाठी अभ्यासपूर्ण व्याखाने देणार आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या आपत्तीमध्ये विद्यापीठाच्या नवीन  परीक्षा पद्धतीमुळे गोंधळात असलेल्या तृतीय वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना गुगल च्या माध्यमातुन ५३ सराव प्रश्नपत्रिका व्हाट्सअँप, फेसबुक, इन्स्ट्राग्राम या माध्यमांच्याद्वारे उपलब्ध करून  दिल्या आहेत. 

या उपक्रमाचे स्वागत इतर कॉलेज मधील विद्यार्थी, शिक्षक व प्राचार्यांनी देखील केले आहे. याचं सेंटरच्या माध्यमातून "माझा वाढदिवस माझी जबाबदारी" या आणखी एका नवीन उपक्रमाचे उदघाटन नुकतेच करण्यात  आले. या अंतर्गत महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येकी कोरोनाच्या कमीत-कमी दहा लसी समाजातील गरीब लोकांसाठी स्वखर्चाने मोफत उपलब्ध करून देणार आहेत. या उपक्रमात सर्व विद्यार्थी वर्गाला समाविष्ट करून जास्तीत-जास्त गरजू व गरीब लोकांना ही लस मोफत पुरवण्याचा निर्धार केल्याचे आऊटरिच सेंटर चे समन्वयक प्रा.डॉ. सुरेश सुतार यांनी सांगितले.

या सामाजिक कर्तव्याची प्रतिज्ञा सुद्धा उपस्थित सर्व प्राध्यापकांना देण्यात आली त्याच बरोबर परिसरातील शाळा व महाविद्यालयातील ग्रंथालयांना आऊटरिच सेंटरच्या वतीने    उपयुक्त ग्रंथाचे मोफत वितरण करण्याचा मनोदय डॉ. सुतार यांनी व्यक्त केला.या सर्व उपक्रमांना कॉलेज चे प्राचार्य डॉ. खोत,उपप्राचार्य डॉ. रावळ यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.या नाविन्यपूर्ण संदेश देणाऱ्या स्तुत्य उपक्रमाचे व विद्यालयाचे अनेकांकडून अभिनंदनासह कौतुक होत आहे

Comments