ठळक बातमीपत्र
सरकारी पातळीवर सर्वाधिक भ्रष्टाचार, प्रत्येक कामासाठी ४० टक्के कमीशन, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा गंभीर आरोप, खंडणी द्यावी लागत असल्यामुळे राज्यात नवे उद्योग येण्यास तयार नाहीत, चव्हाण यांचा दावा
देशात क्रांतीची सुप्त चाहूल, २०२४ च्या निवडणुकीत देशात सत्ता परिवर्तन होईल, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
कोल्हापूर शहरातील जलवाहिनीची गळती आणि पाणी दूषीत करणाऱ्या ठिकाणांचा शोध घेणार रोबोटच्या साहाय्यानं, पाणी पुरवठा समितीच्या बैठकीत निर्णय
पाण्याची अनधिकृत नळ कनेक्शन नियमित करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेनं दिलीय १० दिवसांची मुदत
८० व्या स्वातंत्र्य दिनाचे कोल्हापूरकरांना वेध, तिरंगा ध्वज आणि बॅचचे ठिकठिकाणी स्टॉल, तर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं अनेक उत्पादनांच्या खरेदीवर सवलतींचा पाऊस
गणेशोत्सव काळात सार्वजनिक मंडळं आणि पोलीस प्रशासनातील संघर्ष टाळण्यासाठी कोल्हापूर सार्वजनिक गणेशोत्सव महासमितीची स्थापना, उत्सव शांततेनं आणि सुस्थितीत पार पाडण्याचं समितीसमोर आव्हान
ऊन-पावसाचा खेळ असला तरी पावसाचा जोर वाढला, राधानगरी धरण भरल्यानंतर काळम्मावाडी धरणात ९० टक्के पाणीसाठा, पुढील दोन दिवस पावसाचा मुक्काम कायम
चार दिवस मित्राच्या घरात राहिला, पाचव्या दिवशी सोनं घेऊन पसार झाला, मुरगूड पोलिसांनी आवळल्या मित्र बनून आलेल्या चोराच्या मुसक्या
हर घर तिरंगा अभियानांतर्गत भाजपकच्यावतीनं झाली तिरंगा पदयात्रा, जिल्ह्यात ठिकठिकाणी निघालेल्या तिरंगा रॅलीतून देशभक्तीचा जागर
- कोल्हापूर सर्किट बेंचच्या स्थापना दिनानिमित्त १६ ऑगस्टला होणार विशेष सोहळा, ६ जिल्हयातील वकील संघटनांकडून माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा होणार सन्मान
- स्वातंत्र्य दिनानिमित्त बी न्यूज कार्यालयाला सुट्टी असल्यानं शनिवारचं बातमीपत्र प्रसारीत होणार नाही, याची प्रेक्षकांनी नोंद घ्यावी....
- गोकुळ शिरगावच्या श्रीकृष्ण मंदिर परिसरात धबधबा प्रवाहित, खळाळत्या धबधब्याचं सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
- प्रॅक्टीस फुटबॉल क्लबच्या शतक महोत्सवी वर्षात विविध उपक्रमांचं होणार आयोजन, १६ ऑगस्टला होणार लोगोचं अनावरण
- प्रा. किसनराव कुराडे यांच्या साहित्यावर आधारित प्रबोधक ग्रंथाचं झालं प्रकाशन
- स्वातंत्र्यदिनानिमित्त बीएसएनएलची विशेष योजना, केवळ १ रुपया भरून नव्या ग्राहकांना मिळणार १ जीबी मोबाईल डाटासह विविध सुविधा
- जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार विनय प्रकाशदिप योजनेच्या उजेडात शिक्षणाचे धडे, १ हजार ९९५ शाळातील ८ हजार ९३९ वर्गांमध्ये झाली लाईटची व्यवस्था, शिक्षण सभापती शितल यादव यांची माहिती
- हॉटेल्स, रेस्टॉरंटस्, मिठाई दुकानांची अन्न औषध प्रशासन विभागाने तपासणी करावी, आम आदमी पार्टीची मागणी
- पत्नीच्या खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या आणि दोन वर्षांपूर्वी कारागृहातून पळालेल्या वजीर बारेला याला जुना राजवाडा पोलिसांनी सांगोला तालुक्यातून केली अटक
- पिस्तल तयार करण्यासाठी वापरलेलं व्हीएमसी मशीन पोलिसांकडून जप्त, कबनूरमधील पिस्तल बनवण्याच्या प्रकरणातील सहआरोपींना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा