आजची बातमी पत्र

  • जिल्ह्यात दिवसभर ऊन-पावसाचा खेळ, राधानगरी धरणाचा एक दरवाजा बंद, राजाराम बंधारा ३२ फूटावर, रविवारी हलक्या पावसाचा अंदाज
  • वातानुकुलित आणि पर्यावरणपूरक ई बसेसमुळे कोल्हापूर शहराच्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला मिळणार बळकटी, खासदार धनंजय महाडिक यांचं प्रतिपादन
  • केंद्र शासनाकडून कोल्हापूर शहराला मिळालेल्या १०० ई बसेसमुळे केएमटीची आर्थिक घडी सुधारेल, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास
  • मुक्या जनावरांना वाचवण्यासाठी गोठ्यात धाव घेतली, पण विजेच्या धक्क्यानं पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील ४० वर्षीय दिलीप खोत यांचा दुर्दैवी मृत्यू
  • महागाईनं त्रस्त झालेल्या शेतकरी आणि नागरिकांना आता पाणी वापराच्या वाढीव दराचा फटका, पाणी पुरवठा संस्थांसह लोकप्रतिनिधींचा दरवाढीला तीव्र विरोध
  • जीवबानाना पार्क परिसरातील घरात दागिने आणि रोकड चोरून कुटुंबीयांना मारहाण केल्याप्रकरणी दोघांना न्यायालयानं सुनावली १० वर्षे सक्त कारावासाची शिक्षा
  • छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून नागरिकांना वेगवान सुविधा मिळणार, जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचं खासदार धनंजय महाडिक यांचं आवाहन
  • कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघांतर्गत झालेल्या शिवाजी विद्यापीठातील शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद
  • मृत पतीची विमा पॉलिसी आणि एफडीची रक्कम परस्पर लाटून निकिता पाटील यांची ७० लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुलाची शिरोली इथल्या अनिरुद्ध आणि भारती पाटील या मायलेकावर गुन्हा दाखल
  • लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त विविध पक्ष-संघटना आणि लोकप्रतिनिधींकडून त्यांना अभिवादन, अण्णाभाऊंच्या साहित्यकृतींना मिळाला उजाळा
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन २ ऑगस्ट रोजी कोल्हापुरात होणार, डॉ. श्रीपाल सबनीस आणि शाहीर दिलीप सावंत यांची प्रमुख उपस्थिती
  • शिलाई व्यवसायाचं मोफत प्रशिक्षण आणि मशिन मिळालेल्या महिलांनी उत्तम व्यवसाय करत आत्मनिर्भरतेच्या दिशेनं टाकलं पाऊल, रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन, भागीरथी महिला संस्था आणि वस्त्रम् गारमेंटचा आदर्शवत उपक्रम
  • केशवराव भोसले नाट्यगृहाच्या संदर्भात महासभेनं घेतलेल्या निर्णयाला विरोध करणारे काहीजण म्हणजे कोल्हापूर नव्हे, भाजप पदाधिकाऱ्यांचा पलटवार
  • ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम, कोल्हापूर चित्पावन संघ आणि कऱ्हाडे ब्राह्मण संघात्यावतीनं संतांचे संगती कार्यक्रमाचं आयोजन, ४ ते ८ ऑगस्ट दरम्यान होणार संत साहित्यावर निरूपण
  • घाट रस्त्याला पडल्या भेगा, तर पावसामुळं दरड कोसळण्याचा धोका, आंबा घाट अवजड वाहनांसाठी झाला बंद
  • ग्रामपंचायतीमधील कथित भ्रष्टाचारप्रकरणी कोवाड बंद, चौकशी अहवालात दिसून आली अनियमितता, दोषींवर कारवाईची मागणी
  • पन्हाळगड ते पावनखिंड मार्गावर पार पडला शिवमृत्युंजय पालखी सोहळा, शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
  • शिवनेरी गडावरील शिवछत्रपतींच्या पादुकांचं कोल्हापुरात उत्स्फूर्त स्वागत, शिवप्रेमींनी काढली मिरवणूक
  • दैनिक केसरीच्यावतीनं लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त झाला विशेष कार्यक्रम

टिप्पण्या