आजची बातमी पत्र

  • कोल्हापूर पाऊस अपडेट: गेल्या २४ तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी ३४.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पंचगंगेची पाणी पातळी २८ फूट २ इंचावर पोहोचली असून, बुधवारपासून तीन दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
  • एस. टी. बसचा भीषण अपघात: गडहिंग्लज ते काळभैरी रस्त्यावरील पवार वस्ती बसस्टॉप चौकात भरधाव एस. टी. बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून, अन्य तिघे जण जखमी झाले आहेत.
  • कागल येथे रस्ता अपघात: कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसने महामार्ग ओलांडणाऱ्या स्कूटरस्वाराला चिरडले. यामध्ये कागल येथील ७५ वर्षांचे वृद्ध किशोर रामचंद्र कोतेकर यांचा जागीच मृत्यू झाला.
  • माधुरी हत्तीणीसाठी आंदोलन: नांदणी मठातील माधुरी हत्तीणीला गुजरात मधील वनतारा येथे स्थलांतरित केल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. माधुरीच्या घरवापसीसाठी नांदणीमध्ये एक दिवसाचे उपवास आंदोलन करण्यात आले.
  • पाणी बिल थकबाकीदारांवर कारवाई: पाणी बिल थकबाकीदारांची शंभर नावे वृत्तपत्रातून जाहीर करण्यात आली आहेत. थकबाकीदारांनी बिले भरली नाहीत, तर पाणी कनेक्शन खंडित करून मिळकतीवर बोजा चढवला जाणार आहे.
  • केशवराव भोसले नाट्यगृह खासगीकरणाला विरोध: केशवराव भोसले नाट्यगृह खासगी तत्त्वावर चालवायला देण्यास रंगकर्मीचा तीव्र विरोध आहे. जोरदार घोषणाबाजी करत महापालिकेच्या विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
  • अवैध उत्खननावर मोठा दंड: गौण खनिजांचे अवैध उत्खनन आणि वाहतूक केल्यास रॉयल्टीच्या दहा पट दंड ठोठावण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
  • गोदामाला भीषण आग: लक्षतीर्थ वसाहतीमधील कॅटरिंग कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा संशय असून, यामध्ये ३ लाखांचे नुकसान झाले आहे.
  • घरफाळा थकबाकीदारांवर कडक कारवाई: थकित घरफाळा धारकांवर सख्त कारवाई करण्याचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांचे निर्देश दिले आहेत. उद्दिष्टाच्या २५ टक्क्यांपेक्षा कमी घरफाळा वसूल करणाऱ्या लिपिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
  • अन्नसुरक्षा प्रशिक्षण गरजेचे: शासनाच्या कारवाया टाळण्यासाठी आणि व्यवसायाच्या वृद्धीसाठी अन्नसुरक्षा प्रशिक्षण गरजेचे असल्याचे हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटीने म्हटले आहे.इचलकरंजी महापालिकेत महापौर धातुंडे आणि माजी नगरसेवक पटेकरी यांच्यात शाब्दिक खडाजंगी
    पुणे-बंगळूरू महामार्गावर सरनोबतवाडी इथं सिमेंट काँक्रीटचा टँकर उलटला, अथायू हॉस्पिटलसमोर वारंवार होणाऱ्या अपघाताबद्दल महामार्ग प्राधिकरण आणि पोलिसांनी लक्ष देण्याची गरज
    दैनिक महासत्ताचे संपादक स्वर्गीय वसंतराव दत्तवाडे यांचं पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान अमूल्य, शिवाजी विद्यापीठात झालं व्याख्यान
    हातकणंगले तालुक्यातील मजले इथल्या जमीन सपाटीकरणाच्या कामासाठी इचलकरंजी प्रांताधिकाऱ्यांकडून ३ लाख रुपये हप्त्याची मागणी, प्रविण जनगोंडा यांचा आरोप, तर दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी खोटा कांगावा केल्याचा प्रांताधिकाऱ्यांचा खुलासा
    गोसंवर्धनाची जबाबदारी समाजाने स्वीकारावी, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांचं आवाहन, कुरुंदवाडमधील रामेश्वर कृषी विज्ञान विकास मंडळाच्या गोशाळेचं उद्घाटन
    शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट इथल्या ॲसिड हल्ला प्रकरणातील आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी, ५० हजार रुपयांचा दंड
    मुलावर वेळेत उपचार का केले नाहीत, अशी विचारणा करणाऱ्या पालकाला पन्हाळ्याजवळच्या शाळेत मारहाण, कोडोली पोलिसात गुन्हा दाखल
    वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या २३० वाहनधारकांवर कारवाई करत एका दिवसात १ लाख ८२ हजार ४५० रुपये दंडाची आकारणी, वाहनधारकांनीच स्वयंशिस्त पाळणं गरजेचं
    मद्यधुंद कार चालकानं धडक देऊन गंभीर जखमी केलेल्या गायीला कोल्हापुरातील श्री गायत्री सेवा संस्थेच्या गोरक्षकांनी दिलं जीवदान, वाहन चालकाला राजारामपुरी पोलिसांकडून अटक
    सैनिक टाकळीच्या गायरानातील प्रस्तावित एमआयडीसी रद्द करा, अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन, माजी सैनिकांचा इशारा

टिप्पण्या