- सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गोकुळ दूध संघाच्या कर्मचारी संघटनेनं केलं आंदोलन, गोकुळ कार्यालय परिसरात विनापरवाना झालेल्या आंदोलनामुळे भाजप कार्यकर्ते संतप्त
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीला सामाजिक उपक्रमांची जोड, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून लाखो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देणार, खासदार धनंजय महाडिक यांची घोषणा
- दिवसभरात ऊन-पावसाचा खेळ, २४ तासात पंचगंगेची पाणी पातळी वाढली ८ फुटानं, १९ फूट ११ इंचावर वाहणाऱ्या पंचगंगेमुळं राजारामसह जिल्ह्यातील १३ बंधारे पाण्याखाली
- सोनम वांगचुक यांना केंद्र शासनानं जबरदस्तीनं दवाखान्यात दाखल केल्याच्या विरोधात कोल्हापुरात पुरोगामी पक्ष संघटनांच्यावतीनं झाली निदर्शनं
- सवतकडा धबधबा परिसरात साहसी खेळांचा विस्तार होणार, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते साहसी खेळ, चिल्ड्रन्स पार्क आणि नव्या पर्यटन सुविधांचं लोकार्पण
- फेरीवाला कायद्याप्रमाणं व्यवसाय करण्याची मुभा द्यावी, कृती समितीची मागणी, महापालिकेच्या कारवाई विरोधात सोमवारी सुमारे २ हजार फेरीवाले महापालिकेवर मोर्चा काढणार
- चोरीची दुचाकी विकण्यासाठी आलेल्या अभिजीत देसाई या चोरट्याला शाहूपुरी पोलिसांनी केली अटक, दीड लाखांच्या ५ दुचाकी हस्तगत
- तांत्रिक कौशल्य अंगी असणाऱ्या तरुणांनी नोकरी मागणारे नाही, तर नोकरी देणारे बनावं, खासदार धनंजय महाडिक यांचं प्रतिपादन, आयटीआयमध्ये झाला रोजगार मेळावा
- फुलेवाडी रिंग रोडवरील ग्रामीण हद्दीतील भोगम पार्कमध्ये विना परवाना रस्ता खुदाई आणि पाणी पुरवठा पाईपलाईन टाकल्याप्रकरणी संबंधितांवर महापालिकेच्यावतीने पोलिसात गुन्हा दाखल
- अभिनेते भरत जाधव यांच्याकडून संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाची पाहणी, झालेल्या कामाबद्दल समाधान, मात्र उद्घाटनापूर्वी सर्व तांत्रिक चाचण्या कराव्यात अशी अपेक्षा
- १५ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात होणाऱ्या कार्यक्रमात, कोल्हापुरातील श्रीजा लोकसंस्कृती फाउंडेशनचे कलाकार सहभागी होणार, खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार आणि शुभेच्छा
- तिसऱ्या मुलीच्या जन्मांचेही तितक्याच आनंदाने आणि जल्लोषात स्वागत, नागदेववाडी इथल्या तिवडे परिवाराने घालून दिला आदर्श
- कणेरी इथल्या शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या इमारतीला शॉर्ट सर्किटमुळे आग, लाखो रूपयांचे नुकसान
- सोनम वांगचुक उपोषणात विरोधक राजकारण आणत आहेत, न्यायालयाच्या आदेशानुसारच वांगचुक यांना नेलं रुग्णालयात, खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया
- शाहूवाडी तालुक्यातील निळे इथं बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव कुत्रा ठार, पाच दिवसांत दुसऱ्यांदा बिबट्याचा गावात शिरकाव, तर भुदरगड तालुक्यातील करडवाडी गावाजवळही बिबट्याचे दर्शन, ग्रामस्थ भयभीत
- भागीरथी संस्थेच्यावतीने कोल्हापुरातील बालाजी पार्कमध्ये महिलांसाठी झालेल्या प्रशिक्षण शिबिराला चांगला प्रतिसाद, महिलांना मिळालं विविध १० वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण
- सूरज साखरेवर गोळीबार करणाऱ्या संशयित रफिक आणि शहाबाज मुल्लाला ३ दिवसांची पोलीस कोठडी,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा