महत्त्वाच्या घडामोडी

  • यावर्षी एप्रिल-मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना शासनाचा दिलासा, पीक नुकसानीपोटी ८४ कोटी २३ लाख रुपयांचा निधी मंजूर
  • कागलच्या सीमा तपासणी नाक्यावर अपघात, आयशर ट्रकने दुचाकीला ठोकरल्याने कणेरी इथल्या ३० वर्षांच्या विनायक पाटील यांचा मृत्यू
  • वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता ४० वारकरी एकत्र आल्यास थेट घरापासून पंढरपूरपर्यंत नेणार एस. टी., परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
  • ऐतिहासिक कळंबा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या बेसुमार बांधकामांमुळे पाण्याचे स्रोत थांबले, मुसळधार पाऊस पडूनही तलावाच्या पाणी पातळीत अपेक्षित वाढ नाही
  • रस्ता नव्हे-नागरिकांच्या खस्ता... या मालिकेत पाहूया जयप्रभा स्टुडिओसमोरून यल्लम्मा मंदिरापर्यंत गेलेल्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था
  • आठ दिवसांच्या पावसाने कोल्हापुरातील अनेक रस्ते झाले खड्डेमय, महापालिका प्रशासनाने रस्ते दुरुस्तीकडे लक्ष द्यावे, नागरिक-वाहनधारकांची मागणी
  • रेशन कार्ड धारकांना तीन महिन्यांचे धान्य एकदम देण्याच्या शासन निर्णयामुळे धान्य दुकानदारांसमोर अनेक अडचणी, ई-पॉस मशीनमध्येही तांत्रिक अडचणी कायम
  • कसबा बावड्यातील राजाराम बंधाऱ्यावरून वाहतूक सुरू, मात्र बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणात अडकलेली झाडे-वेली आणि दोन्ही बाजूला निसरडा रस्ता, कचरा यामुळे वाहनधारक हैराण
  • दोन महिने पगार झाला नसल्याने इचलकरंजीतील घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
  • इचलकरंजीजवळ कबनूर इथे पाणी भरताना शॉक लागून ३९ वर्षीय विवाहितेचा मृत्यू
  • राधानगरी तालुक्यातील तुळशी धरणग्रस्तांना करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला इथे दिलेल्या भूखंडावरील अतिक्रमणं हटवावीत, ब्लॅक पँथर पक्षाची मागणी.
  • डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे सीपीआरमध्ये राजाराम कांबळे यांचा अकाली मृत्यू, रिपब्लिकन कामगार सेनेचे १३ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण.
  • श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामं सुरू, मात्र प्रत्येक बारीक-सारीक कामावरही देवस्थान समिती आणि पुरातत्व विभागानं लक्ष ठेवण्याची गरज, अन्यथा पुरातन ठेवा नष्ट होण्याची भीती.
  • नागरिकांमध्ये जनजागृती करून एसआयआर मोहिम प्रभावीपणे राबवा, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर मतदारसंघाचा आढावा.
  • हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या वाशी इथल्या सनराईज लॉजवर करवीर पोलिसांचा छापा, पिडितेची सुटका, दोघांना अटक.
  • कर्णबधिरांच्या मदतीसाठी सेतू संस्थेच्यावतीने पुण्याच्या अक्षरवेध संस्थेनं कोल्हापुरात सादर केला सावरकर समग्र दर्शन प्रयोग.
  • खंडपीठासाठी झेंडा पार्क इथे ८२ एकर जागा निश्चित, त्याचा जीआर काढण्यासाठी प्रयत्न करणार, मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाह मुख्य न्यायाधीश रविंद्र घुगे यांचं प्रतिपादन.
  • कोल्हापुरातील प्रचंड वर्दळीच्या ताराबाई रोडवर दिवसभर वाहतूक कोंडीचा प्रत्यय, नागरिकांसह भाविक-पर्यटकही त्रस्त, महापालिका प्रशासन आणि वाहतूक विभागानं कारवाई करण्याची गरज.
  • क्लायमेट सत्याग्रह जनतेच्या माध्यमातून पुढं जाणं आवश्यक, सोलर मॅन ऑफ इंडिया प्रा. चेतनसिंह सोळंकी यांचं मत, शिवाजी विद्यापीठात झालं व्याख्यान.

टिप्पण्या

news.mangocity.org