15/07/26 बातमीपत्र

  • शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या साडेसात हॉर्स पॉवरपर्यंतच्या वीज जोडणीची ४८ हजार कोटी रुपयांची जुनी बिलं माफ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
  • पती, सासू आणि दीर यांच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यात कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल, माहेरहून दागिने आणि पैसे आणण्यासाठी छळ केल्याचा विवाहितेचा आरोप, तर मुलगी झाल्याचाही राग
  • कोल्हापुरातील माळकर तिकटी, गंजी गल्ली आणि बिंदू चौक परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी धडक कारवाई, दोन लॉजिंग सील, अनधिकृत साहित्य जप्त
  • महापालिका पदाधिकाऱ्यांच्या अतिक्रमणांवर जुजबी कारवाई का, अन्य व्यवसायिकांचा सवाल, अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत महापालिका कर्मचारी भेदभाव करत असल्याचा दावा
  • आषाढ महिन्यातील पहिला दिवस कोरडाच, गेल्या २४ तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी ०.३ मिलिमीटर पावसाची नोंद, पंचगंगेची पाणी पातळी ११ फूट २ इंचावर
  • ट्रकनं दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात इचलकरंजीतील ६० वर्षांचे रहिमतुल्ला आलम पठाण यांचा मृत्यू, तर नात सुफिरा किरकोळ जखमी, कबनूरमधील दुर्घटना
  • अचानक आधारकार्ड निष्क्रीय झाल्यानं राजारामपुरीतील ५९ वर्षीय संगीता पाटील यांची व्यथा, रेशनवरील धान्य नाही की बँक खात्यावरील पैसे काढता येत नाहीत
  • इचलकरंजी महापालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये फूट, २२ कोटींच्या घनकचरा व्यवस्थापन अंदाजपत्रक मंजुरीचा विषय भाजपच्या हाळवणकर गटानं पाडला हाणून
  • ओव्हरटेक केल्याच्या वादातून कागलजवळ महामार्गावर झाली कर्नाटककडील भाविकांना बेदम मारहाण, स्थानिक तरुणांच्या झुंडशाहीमुळं कोल्हापूरच्या प्रतिमेवर आणि भाविकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा, राज्यातील २३ लाख शेतकऱ्यांना होणार लाभ
  • राज्यभरातील विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली विविध खात्यांच्या मंत्र्यांची भेट
  • कॉम्रेड सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाला कोल्हापुरातून इंडिया आघाडीचा पाठिंबा, शाहू समाधी स्थळी झालं धरणं आंदोलन
  • जशा शासकीय सेवा मिळणार, तसाच शासनाकडे पाहण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन असणार, राज्य आयुक्त सुधाकर तेलंग यांनी जिल्ह्याच्या प्रशासकीय कामगिरीचे केलं कौतुक
  • छत गळतीच्या पार्श्वभूमीवर श्री अंबाबाई मंदिराची सामाजिक कार्यकर्त्यांकडून पाहणी, शास्त्रोक्त पद्धतीनं मंदिर विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्याची मागणी
  • वाहतूकदारांचा थकीत दंड पूर्णपणे माफ करावा आणि सध्याची जाचक ई-चलन प्रणाली कायमची रद्द व्हावी, यासाठी व्यापक लढा उभारणार, कोल्हापूर जिल्हा बस वाहतूकदार संघटनेची झाली बैठक
  • कोल्हापुरातील प्रसिद्ध छायाचित्रकार मोहन मेस्त्री यांनी बनवल्या नारळाच्या करवंट्यांपासून आकर्षक वस्तू, फुटबॉल विश्वचषकाची प्रतिकृती आली चर्चेत
  • कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार असलेला इचलकरंजीतील जर्मनी गँगचा म्होरक्या अविनाश जाधव याला हत्यारासह अटक
  • राजाराम बंधाऱ्यात पडलेल्या नंदकुमार तेलवेकर या वडणगे इथल्या तरुणाला बावडा रेस्क्यू फोर्सकडून जीवदान, धडक देणाऱ्या चारचाकी चालकाने नुकसान भरपाई दिल्याने तक्रारीची नोंद नाही
  • पैजेच्या पैशाच्या मागणीवरून इचलकरंजीत कोयता हल्ला, चौघांना अटक
  • इचलकरंजीतील गॅरेज चालकास लोखंडी घणाने मारहाण करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार रुपेश नरवाडे याला अटक
  • बेळगाव इथं झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या अक्षय पाटील या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

टिप्पण्या

news.mangocity.org