मुख्य सामग्रीवर वगळा
आज चे बातमी पत्र
- नागाळा पार्क जागा प्रकरण: नागाळा पार्कातील अमेरिकन बंगल्याच्या जागेचा 'ब' सत्ता प्रकार म्हणजे सरकारी मालकी कायम राहील. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय; प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी दिली माहिती.
- शिरोली एमआयडीसीत चोरी: शिरोली औद्योगिक वसाहतीत चोरांचा धुमाकूळ; दोन दिवसांत चार ते पाच कंपन्यांमधून ४५ लाखांच्या उत्पादनांची चोरी. उद्योजक हवालदिल.
- पन्हाळा ग्रामीण रुग्णालय: पन्हाळा ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी निवासस्थाने धूळखात; वापराअभावी इमारतीची दुरवस्था, दुरुस्तीची तातडीने गरज.
- दुर्मिळ शस्त्रक्रिया: कणेरी मठावरील सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये अत्यंत दुर्मिळ 'ब्रेन बायपास' शस्त्रक्रिया यशस्वी. १७ तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर ५० वर्षीय महिलेला जीवदान; डॉ. शिवशंकर मरजक्के आणि १० डॉक्टरांच्या टीमची यशोगाथा.
- खत खरेदी ॲप निष्प्रभ: रासायनिक खत खरेदीसाठी बनवलेले मोबाईल ॲप कुचकामी ठरल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी; मृग नक्षत्र सुरू होऊनही खत मिळेना.
- अंबाबाई मंदिराला सुवर्ण कलश: गोव्याच्या भाविकाकडून कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिराला सुवर्ण कलश अर्पण; शुक्रवारी होणार सुवर्ण कलशारोहण सोहळा.
- भुदरगड अपघात: भुदरगड तालुक्यातील पळशिवणे ते गंगापूर दरम्यान दुचाकी घसरून अपघात; दोघांचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी.
- कोल्हापुरात फुटबॉल ज्वर: कोल्हापुरात फुटबॉल विश्वचषकाची क्रेझ; पेठा आणि तालीम संस्थांच्या परिसरात दिग्गज फुटबॉल खेळाडूंचे डिजिटल फलक आणि कटआऊट्स.
- मराठा आरक्षण मागणी: कोल्हापूर गॅझेट लागू करून मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा, अशी मराठा संघटनांची आग्रही मागणी.
- रस्ते कामाचा वाद: इचलकरंजीतील १२ कोटींच्या काँक्रीट रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा 'शिव शाहू आघाडी'चा आरोप. काम बंद ठेवण्याच्या ठेकेदाराच्या पत्रामुळे परिसरात खळबळ.
- प्रवाशांना दिलासा: इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरकडून सोन्यामारुती चौकात उभारलेला आधुनिक बस थांबा महानगरपालिकेकडे सुपूर्द.
- ललित कला विद्यापीठ: कोल्हापुरात ललित कला विद्यापीठाच्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळेल, अशी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत यांनी माहिती दिली. शाहू स्मारक मध्ये कलाप्रदर्शनाला प्रारंभ.
- दुर्दैवी घटना: कोल्हापुरातील गजानन महाराज नगर परिसरातील २९ वर्षांच्या विशाल हरी शेळके या तरुणाची कागल जवळ झाडाला गळफास लावून आत्महत्या.
- पोलिस कारवाई: बेकायदेशीररित्या घरगुती गॅस सिलेंडर विक्री करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक. ३८ सिलेंडरसह सव्वातीन लाखांचे साहित्य जप्त.
- अतिक्रमण मोहीम: बिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार चौक रस्त्यावर महानगरपालिकेची 'अतिक्रमण निर्मूलन मोहीम' राबवण्यात आली; अनधिकृत साहित्य जप्त.
- डॉ. बापूजी साळुंखे गौरव: शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या शैक्षणिक कार्याचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून गौरवोद्गार.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा