दिनविशेष

  • वर्षांच्या चिमुकल्याचा पंचगंगा नदीत बुडून मृत्यू, करवीर तालुक्यातील शिंगणापूरमधील दुर्घटना.
  • यंदाचा मानाचा राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि लेखक स्वर्गीय जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर जाहीर, शाहू जयंती दिनी होणार पुरस्काराचे वितरण.
  • नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर गोव्यातील कॅसिनोमध्ये खुलेआम जुगार खेळतात, जनतेने त्यांच्याकडून काय बोध घ्यावा; ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवीकिरण इंगवले यांच्या पत्रकार परिषदेत आरोपांच्या फेरी.
  • रवीकिरण इंगवले यांच्याकडून वारंवार आमदार राजेश क्षीरसागर आणि कुटुंबीयांना बदनाम करण्याचं षडयंत्र, कायदेशीर सल्ला घेऊन कारवाईची दिशा ठरवणार; नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांचा खुलासा.
  • मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नातेवाईकांचा डोळा चुकवून खाटीक कुटुंबियांच्या घरातील चोरी प्रकरणी अशफाक साठीला लक्ष्मीपुरी पोलिसांकडून अटक, १८ लाखांचे दागिने हस्तगत.
  • रासायनिक खतांची मागणी नोंदवण्यासाठी आता कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना मिळणार मोबाईल ॲप, खतांचा काळा बाजार आणि लिंकिंगला पूर्णविराम.
  • क्रिकेट बेटिंगसह गांधीनगरमधील सर्व अवैध धंदे बंद करा, अन्यथा शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने आंदोलनाचा इशारा
  • पन्हाळा तालुक्यातील कुंभारवाडीत टायफॉईडचा शिरकाव, सहा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क
  • शेतीसाठी वापराच्या पाणी बिलात वाढ करण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, सिंचन भवन समोर झालं आंदोलन
  • पोहण्यास शिकणाऱ्या व्यक्तींकरता जीव वाचवण्यासाठी जीवरक्षक दिनकर कांबळे तीन दिवसीय प्रशिक्षण देणार
  • नदी प्रदूषणाबाबत सुरू असलेल्या आंदोलनामुळे बंद असलेले इचलकरंजीतील प्रोसेस उद्योग सुरु करण्यास प्रशासनाची मान्यता
  • महायज्ञ आणि महाआरतीमुळे इचलकरंजीतील पंचगंगा नदी घाटावर अलोट गर्दी
  • कोल्हापुरातील पार्श्वनाथ बँकेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योजक शंकर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त झाले विविध उपक्रम
  • ठाकरे गट शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले आणि शहरप्रमुख मंजीत माने यांच्यातील वादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल
  • सरस्वती टॉकीज जवळील बहुमजली पार्किंग इमारतीमध्ये लाईट आणि पाण्याची सोय नसल्याने रस्त्यावरील केबिनधारकांचा गाळ्यामध्ये जाण्यास नकार, मूलभूत सुविधा मिळाल्यानंतरच स्थलांतर करण्याची तयारी.
  • जादा परताव्याचं आमिष दाखवून इचलकरंजीत सव्वादोन कोटींची फसवणूक, मोहसीन मणेर आणि मुदस्सर मकानदार यांच्यावर गुन्हा दाखल.
  • तीन दिवस उशिरा आलेला मान्सून केरळमध्ये दाखल, पुढील ४८ तासांत कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाची शक्यता, १५ जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र व्यापणार.व्यापणार

टिप्पण्या